amitabh bachchanEntertainment- बिग बी अमिताभ बच्चन (amitabh bachchan) आता थकले आहेत. असं आमचं म्हणणं नाहीए तर खुद्द बिग बींनी हे जाहीरपणे सोशल मीडियावर असं म्हटलं आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल (post viral on social media) होते आहे. या पोस्टमधून अमिताभ यांनी केबीसी शोमधून (kaun banega crorepati live) रिटायरमेंट घेत असल्याचे जणू संकेत दिलेत. नुकताच अमिताभ यांनी केबीसीचा अखेरचा एपिसोड शूट केला. आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.

'माफ करा, मी थकलोय आणि आता रिटायर झालोय. मी तुमच्या सर्वांची माफी मागतोय, कौन बनेगा करोडपतीच्या चित्रिकरणाचा अखेरचा दिवस खूपच लांबला. कदाचित उद्या पुन्हा करेन. मात्र  हे लक्षात ठेवा की काम तर काम असतं आणि ते तन्मयतेने करायला हवं. 

--------------------------------------

Must Read
--------------------------------------

शुटींगच्या शेवटच्या दिवशी फेअरवेलच्या निमित्ताने खूप सारं प्रेम मिळालं. शेवटी सगळ्या गोष्टी एकमेकांशी जुळलेल्या आहेत. इच्छा हिच आहे की, कधीच थांबायचे नाही, सतत चालत रहायचे.आशा आहे की हे सगळं पुन्हा होईल. सेटवर सगळ्यांनी कायमच माझी काळजी घेतली. अनेक महिन्यांपासून सगळे जण एकत्र होतो. ते क्षण कायम आठवणीत राहतील. केबीसी (kaun banega crorepati live) शोच्या क्रू मेंबर आणि सर्व टीमचे आभार.'