amazon-great-republic-day-sale-is-going-to-start

(online shopping) Amazon कायमच दर 3-4 महिन्यांतून एक बिग ब्रँड सेल घेऊन येताना दिसतो. यापूर्वी अॅमेझॉन ऑक्टोबर 2020 मध्येही सेल आणला होता आणि आता पुन्हा प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत पुन्हा एकदा सेल आणला आहे Amazon Great Republic Day सेल 20 जानेवारीला सुरू होणार असून 23 जानेवारीपर्यंत ग्राहक त्याचा लाभ घेऊ शकणार आहेत.

या सेलमध्ये ग्राहक 99 रुपयांपासून वस्तू खरेदी करू शकणार आहेत. यासाठी दररोजच्या वापरातील 40,000 हून अधिक वस्तू उपलब्ध आहेत. याचबरोबर विविध ब्रँडेड वस्तूंवर 80 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळू शकणार आहे. या सेलसाठी अॅमेझॉनने एसबीआय (SBI) बरोबर पार्टनरशिप केली आहे. एसबीआयच्या क्रेडिट कार्डवर खरेदी केल्यास तात्काळ 10 टक्क्यांचा डिस्काऊंट मिळणार आहे.

तसंच खरेदी दरम्यान सुलभ हफ्त्यांची देखील सोय करून देण्यात आली आहे. 12 महिने नो-कॉस्‍ट ईएमआई (No Cost EMI) चा पर्याय देखील देण्यात आला आहे. 2,083 रुपयांपासून हा हफ्ता सुरू होत आहे. या सेलमध्ये  स्मार्टफोन, लॅपटॉप (Laptop), कॅमेरा, मोठे टीव्ही (TV), आणि होम अँड किचन प्रॉडक्टवर मोठी सूट मिळणार आहे.

या सेल दरम्यान स्मार्टफोन आणि इतर डिव्हाइसवर देखील डिस्काउंट (Special Deal) मिळणार आहे.  मोबाईल फोनच्या खरेदीवर देखील या सेलमध्ये मोठी सूट मिळणार आहे. 4999 रुपयांपासून यात मोबाईल फोन खरेदी करता येणार आहे. याचबरोबर विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक (online shoppingवस्तूंवर देखील सूट मिळणार आहे. 199 रुपयांपासून विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पुस्तके आणि खेळण्यांवर देखील 70 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.

दरम्यान, घरगुती वापराच्या वस्तू (Home Appliances) आणि किचनमधील वस्तूंवर देखील भरघोस सूट मिळणार आहे. होम अँड किचन प्रोडक्टवर ऑफर आणि सूट मिळणार आहे. किचनमधील वस्तू तुम्ही 399 रुपयांपासून खरेदी करू शकता तर स्वयंपाकाची भांडी (Cookware & dining) देखील 149 रुपयांपासून खरेदी करू शकता. घर सजावटीच्या वस्तू ( Home & Decor) देखील तुम्ही 79 आणि 99 रुपयांपासून खरेदी करू शकता.  त्यामुळं खरेदी करायची असल्यास तुम्ही या सेलचा फायदा घेऊ शकता.

हा सेल इतरांसाठी 4 दिवसांचा असला तरी अॅमेझॉन प्राईम मेम्बरशिप (Amazon Prime Membership) असणाऱ्या व्यक्तींना 19 तारखेपासूनच या Amazon Great Republic Day सेलमध्ये  खरेदी करता येणार आहे.