sharad pawar on dhananajy munde


राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)चे दोन नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) तसंच नवाब मलिक (Nawab Malik) वादात सापडले आहेत, त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी धनंजय मुंडेंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यापुढच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्यावरचे आरोप (molestation) गंभीर आहेत, असं शरद पवार म्हणाले आहेत. धनंजय मुंडे यांनी माझी भेट घेतली आणि संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. मुंडे यांनीही या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे, असं शरद पवार म्हणाले.

धनंजय मुंडे यांनी मला दिलेली माहिती मी पक्षासमोर मांडेन, संघटनेच्या प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन आणि चर्चा करून लवकरच याबाबत निर्णय घेऊ, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

--------------------------------------

Must Read




--------------------------------------

दुसरीकडे शरद पवार यांनी नवाब मलिक यांचा मात्र बचाव केला आहे. मलिक यांच्यावरचे आरोप वैयक्तिक नाहीत, असं शरद पवार म्हणाले आहेत.

काय आहे वाद?

धनंजय मुंडे यांनी आपले विवाहबाह्य संबध असून यातून आपल्याला दोन मुलं झाली आहेत, याची कबुली दिली, तसंच त्यांच्यावर बलात्काराचा आरोपही (molestation) करण्यात आला आहे. निवडणुकीसाठी भरलेल्या प्रतिज्ञापत्रात धनंजय मुंडे यांनी या दोन मुलांचा उल्लेख केलेला नाही, त्यामुळे त्यांच्यावर माहिती लपवल्याचाही आरोप आहे. तर नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने अटक केली आहे.