allahabad-hc-gives-a-verdict-that-couples-who-want

(love marriage) सध्या लव जिहाद (love jihad) प्रकरणांवरून धुरळा उडतो आहे. मात्र त्यात एक चांगली बातमी आली आहे. लग्नांच्या रजिस्ट्रेशनबाबत ही बातमी आहे. रजिस्टर लग्न करणाऱ्यांसाठी, विशेषतः आंतरजातीय- आंतरधर्मीय लग्न करण्यासाठी आता नोंदणीची प्रक्रिया थोडी सोपी होणार आहे. अलाहाबाद हायकोर्टाच्या (Allahabad high court) लखनऊ बेंचनं हा निर्णय सुनावला आहे. हायकोर्टानं लग्नाआधी (marriage) नोटिसा प्रकाशित होणं आणि त्यावर आक्षेप नोंदवण्याचा वेळ देणं या प्रक्रियेवरच आक्षेप नोंदवला आहे. न्यायालयानं या प्रक्रियेला स्वातंत्र्य (freedom) आणि खासगीपणावरचा (privacy) घाला असं संबोधलं आहे.

न्यायालयानं विशेष विवाह अधिनियमाच्या (special marriage act) कलम 6 आणि 7 यांनासुद्धा अयोग्य ठरवलं आहे. न्यायालयानं म्हटलं, की कुणाच्याही हस्तक्षेपाविना आपल्या आवडीचा जोडीदार निवडणं हा व्यक्तींचा हक्क आहे. स्पेशल मॅरेज एक्टनुसार न्यायालयानं हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कोर्टानं आपल्या निर्णयात एका महिन्यापर्यंत लग्न करणाऱ्यांसाठी त्यांचा फोटो नोटीस  बोर्डावर चिकटवण्याच्या बंधनालाच संपवून टाकलं आहे.

आपल्या निर्णयात कोर्टानं म्हटलं आहे, की जर लग्न करणाऱ्या लोकांना मान्य नसेल तर त्यांची गोपनीय माहिती सार्वजनिक केली जाऊ नये. अशा लोकांची माहिती प्रकाशित करून त्यांची अप्रतिष्ठा केली जाऊ नये. मात्र विवाह अधिकाऱ्यांसमोर हा पर्याय खुला असेल की तो दोन्ही पक्षांची ओळख, वय आणि इतर तथ्यांना पडताळून घेऊ शकेल. न्यायालयानं हेसुद्धा म्हटलं आहे, की हे असं करण्याची प्रक्रिया अतिशय जुनाट आहे. हे तरुण पिढीवर अन्याय करणारं आणि क्रूर आहे.(love marriage)

स्पेशल मॅरेजबाबत हा निर्णय हायकोर्टाच्या लखनऊ बेंचच्या जस्टीस चौधरी यांनी दिला. साफिया सुलतान यांच्या बंदी प्रात्यक्षिकरण याचिकेवर कोर्टानं हा आदेश दिला आहे. साफिया सुलतान हिनं हिंदू धर्माचा स्वीकार करत अभिषेक कुमार पांडेय याच्याशी लग्न केलं होतं. लग्नासाठी साफिया सुलतान हिनं आपलं नाव बदलून सिमरन असं केलं होतं. हायकोर्टानं सुनावणी पूर्ण झाल्यावर 14 डिसेंबरला आपला निर्णय सुनावला बुधवारी हायकोर्टानं लखनऊ बेंचानं आपला निर्णय सुनावत या याचिकेवर निर्णय दिला.