ajit pawar


राज्य शासनाने (state government) नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत गुंठेवारीचा निर्णय घेतला. हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांचा सत्कार करण्यासाठी 10 ते 12 गावचे ग्रामस्थ आले होते. कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक आल्याने अजित पवार यांचा पारा चांगलाच चढला. यावेळी आलेल्या कार्यकर्त्यांना (activists) त्यांनी सुनावले. अरे मी सत्कार स्वीकारत बसलो तर काम कोण करणार असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना फैलावर घेतले.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात एका बैठकीच्या निमित्ताने विभागीय आयुक्त कार्यालयात (state government) आले होते. त्यावेळी कोणतीही पूर्व कल्पना न देता 10 ते 12 गावचे ग्रामस्थ अजित पवार यांचा सत्कार करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्या शिस्तीच्या स्वभावचं दर्शन कार्यकर्त्यांना घडवले. यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांवर आणि प्रवक्त्यांवर चिडले. अरे मी काम करु की सत्कार स्वीकारत फिरू, असा शब्दात त्यांनी सुनावलं. त्यामुळे अजित पवारांचा सत्कार करण्यासाठी मोठ्या उत्साहात आलेल्या कार्यकर्त्यांचा (activists) हिरमोड झाला.

---------------------------------

Must Read

1) जिओची डीलरशिप हवीय? आमिषाला बळी पडू नका; १ कोटी १० लाखांची फसवणूक

2) कोरोना लसीकरणाची पुढची दिशा ठरणार?; पंतप्रधान मोदी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

3) राजर्षी छत्रपती शाहू समाधीकरिता आठ कोटींचा निधी : एकनाथ शिंदे

---------------------------------

पूर्व नियोजीत बैठका आणि कार्यक्रम ठरले असल्याने गावकऱ्यांचा सत्कार समारंभात वेळ गेल्यास पुढचं संपूर्ण शेड्यूल बिघडणार असल्याचे लक्षात आल्यानंतर अजित पवार यांनी प्रवक्त्याला चांगलेच सुनावले. आज सत्कार स्वीकराला तर रोजच सत्कार स्वीकारावा लागेल. मी काम करु की सत्कार स्वीकारू ? असा सवाल अजित पवार यांनी केला. यावेळी गावकरी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे गावकऱ्यांचा अजित पवार यांचा सत्कार करण्याचा अपेक्षाभंग झाला.