टेलिकॉम कंपनी (telecom company) एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन Data Add-On प्रिपेड प्लॅन लाँच केले आहेत. कंपनीने 78 रुपये आणि 248 रुपयांचे दोन प्लॅन आणले असून यात Wynk म्यूझिक अ‍ॅपचं प्रीमियम सबस्क्रिप्शन मोफत मिळतं. एअरटेल थँक्स अ‍ॅपमध्ये (airtel) हे दोन्ही नवीन प्लॅन उपलब्ध झाले आहे. दोन्ही प्लॅनबाबत (prepaid plan) सविस्तर जाणून घेऊया :

Airtel चा 78 रुपयांचा प्लॅन :-

एअरटेलने (airtel) नवीन 78 रुपयांचा प्लॅन आणला असून यामध्ये एकूण 5 जीबी डेटा मिळतो. याशिवाय या प्लॅनमध्ये एका महिन्यासाठी Wynk Premium सबस्क्रिप्शन मोफत मिळतं, पण या प्लॅनसोबत व्हॅलिडिटी मिळत नाही. कारण हा फक्त डेटा रोलओव्हर प्लॅन आहे. म्हणजे तुम्ही आधीपासून वापरत असलेल्या प्लॅनच्या वैधतेपर्यंतच या प्लॅचा लाभ घेता येईल. तर, डेटा मर्यादा संपल्यानंतर एका एमबीसाठी 50 पेसे याप्रमाणे शुल्क आकारलं जाईल.

------------------------------------

Must Read

💪1) धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा

😱 2) पेट्रोल 92 च्या पार, डिझेलचेही दर वाढले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

 🏢 3) बेकायदेशीर बांधकाम प्रकरण, उच्च न्यायालयाचा सोनू सूदला दणका

------------------------------------

Airtel चा 248 रुपयांचा प्लॅन :-

या प्लॅनमध्ये (prepaid plan) एकूण 25 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनसाठीही वेगळी कोणती व्हॅलिडिटी नाहीये. तसेच यामध्येही Wynk Premium सबस्क्रिप्शन फ्री मिळतं. पण यात मिळणारं Wynk सबस्क्रिप्शन एका महिन्यासाठी नव्हे तर एका वर्षासाठी मिळतं.

वेगळं Wynk Premium सबस्क्रिप्शन :-

युजर्स त्यांच्या आवश्यकतेनुसार वेगळं Wynk Premium सबस्क्रिप्शनही घेऊ शकतात. यासाठी एअरटेल थँक्स अ‍ॅप होमपेजवर डिजिटल स्टोअरवर क्लिक करावं लागे. इथे तुम्हाला Wynk Premium चा पर्याय दिसेल. Wynk Premium च्या एका महिन्याच्या सबस्क्रिप्शनसाठी 49 रुपये आणि एका वर्षाच्या सबस्क्रिप्शनसाठी 399 रुपये द्यावे लागतील.