after-mansi-naik-this-popular-marathi-actress-has-married

(Married) लॉकडाऊनच्या (lock down) काळात अनेक सेलिब्रिटी (celebrity) पालक बनले. आता नव्या वर्षात अनेक सेलिब्रिटींना जन्मोजन्मीच्या बंधनात अर्थात लग्नगाठीत अडकण्याचे (wedding) वेध लागले आहेत असं दिसतंय. विशेषतः मराठी तारे-तारकांबाबत (Marathi actors and actresses) हे चित्र दिसून येतं आहे.

नवया वर्षात लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक (Mansi naik), आशुतोष कुलकर्णी आणि अभिज्ञा भावे हे कलावंत लग्नबंधनात अडकले. त्यानंतर आता चाहत्यांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता परब (Prajakta parab) विवाहबंधनात अडकली आहे. अंकुश मरोदे याला तिनं आपला जीवनसाथी (life partner) बनवलं आहे. आपल्या या प्रेक्षणीय लग्नाचे (wedding ceremony) फोटो तिनं नुकतेच सोशल मीडियावर (social media) अपलोड केले आहेत. या फोटोजना भरभरून लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.

अंकुश मरोदे याच्यासह 9 जानेवारी 2021 ला प्राजक्तानं लग्न केलं. (Married) एका सोशल मीडियावरील फोटोला कॅप्शन देताना तिनं लिहिलं, 'माझ्या नवऱ्याची बायको'. केवळ लग्नाचेच नाही तर प्राजक्तानं आपल्या हळदी समारंभ आणि मेहेंदी सेरेमनीचेही फोटोज शेअर केले आहेत.

प्राजक्ता परबनं आजवर ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण, ललित २०५ या मालिकांमध्ये काम केलं आहे. सोबतच 'माझ्या मित्राची गर्लफ्रेंड' या वेबसिरीजमध्येही (webseries) तिनं उठावदार अभिनय केला आहे. अंकुश मरोदे हा तिचा जोडीदार लेखक आणि दिग्दर्शक (director) आहे.

येत्या काळात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हेदेखील लवकरच विवाह करणार आहेत. सोबतच 'नटरंग'फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीसुद्धा कुणाल बेनोडेकरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.