airtel


telecom company रिलायन्स जिओ (reliance jio) 1 जानेवारीपासून राज्यांतर्गत व्हॉईस कॉल (voice call) विनामूल्य करणार आहे. आयआयसीच्या कारभारामुळे सध्या जिओ ग्राहकांकडून ऑफ-नेट व्हॉईस कॉलसाठी शुल्क आकारले जात होते. अशा सेवांवरील इंटरकनेक्ट वापर शुल्क (आययूसी) संपल्यानंतर रिलायन्स जिओ इन्फोकॉम पुन्हा एकदा 1 जानेवारीपासून ऑफ-नेट राज्यांतर्गत व्हॉईस कॉल विनामूल्य केले आहे.

त्यांनतर आता जिओने देशभरात राज्यांतर्गत कॉलिंग फ्री देण्याची घोषणा केल्यानंतर एअरटेलने जिओला टक्कर देण्यासाठी आपल्या रिचार्ज मध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. भारती एअरटेलने १९९ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये आता १.५ जीबी डेटा देणे सुरू केले आहे. आतापर्यंत एअरटेलच्या युजर्संना १९९ रुपयांच्या प्रीपेड पॅकमध्ये केवळ १ जीबी डेटा रोज मिळत होता. परंतु, आता या प्लानमध्ये युजर्संना १.५ जीबी डेटा मिळणार आहे.

मात्र एअरटेलची (telecom company) ही ऑफर काही निवडक युजर्संना दिली जात आहे. एअरटेलच्या वेबसाइटवर आंध्र प्रदेश आणि तेलंगाना, कर्नाटकमधील काही सर्कलमध्ये काही निवडक नंबर्सवर १९९ रुपयांच्या रिचार्जवर रोज १.५ जीबी डेटा दिला जात आहे. १९९ रुपयांच्या एअरटेल प्रीपेड प्लानमध्ये आता २८ दिवसांसाठी रोज १.५ जीबी डेटा ऑफर केला जात आहे. म्हणजेच ग्राहकांना एकूण ४२ जीबी डेटा दिला जाणार आहे. याशिवाय, देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि १०० एसएमएस फ्री मिळणार आहे. या रिचार्ज सोबत ग्राहकांना फ्री हेलोट्यून्स, विंक म्यूझिक सब्सक्रिप्शन आणि एअरटेल एक्स्ट्रीम अॅपचे सब्सक्रिप्शन ऑफर केले जात आहे.

----------------------------------------

Must Read

1) BREAKING: UK च्या फ्लाइट्सबद्दल भारताचा मोठा निर्णय!

2) मोठी बातमी, संजय राऊत यांच्या पत्नीबद्दल ईडीने केला नवीन खुलासा

3) 'हा सरपंचपदाचा नसून लोकशाहीचा लिलाव', अण्णा हजारे संतापले

4) Whatsapp वर कुणी ब्लॉक केलंय? या साध्या ट्रिक्सनी काढा शोधून!

5) नवीन वर्षात ठाकरे सरकारचा कैद्यांना दिलासा

----------------------------------------

एअरटेलच्या (airtel prepaid plan)२४९ रुपयांच्या प्रीपेड पॅक उपलब्ध आहे. २४९ रुपयांच्या प्लानमध्ये सर्व ऑफर्स १९९ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणारे आहेत. यात फास्टॅग खरेदीवर १०० रुपयांचा कॅशबॅक आणि एक वर्षासाठी शॉ अकाडमी ऑनलाइन कोर्स उपलब्ध आहे. १९९ आणि २४९ रुपयांच्या रिचार्ज प्लानदरम्यान, एअरटेलकडे २१९ रुपयांचा पॅक सुद्धा उपलब्ध आहे. पॅकसोबत २८ दिवसांसाठी १ जीबी डेटा रोज मिळतो.

जिओच्या घोषणेनंतर भारती एअरटेलचे शेअर्स बीएसईच्या इंट्रा डे व्यापारात जवळपास 2 टक्क्यांनी घसरले होते. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, जिओची मालकी असणारी स्वतंत्र नेटवर्क ट्रस्टची एकमेव लाभार्थी आहे जी नेटवर्क 18 मीडिया आणि गुंतवणूक नियंत्रित करते.