(Crime) आपल्या गर्लफ्रेंडला (girlfriend) स्मार्टफोन (smartphone) घेऊन देण्यासाठी एका तरुणानं हे टोकाचं पाऊल उचललं. या हत्येमध्ये सहभागी झालेल्या दोन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं आहे. मात्र ही एक ब्लाइंड केस असल्यानं तिला सोडवणं अतिशय आव्हानास्पद होतं असं पोलीस (police) म्हणाले.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आग्रा (Agra) जिल्ह्यात एक हत्येचं प्रकरण समोर आलं आहे. एका तरुणानं अतिशय किरकोळ कारणासाठी चक्क एकाची हत्या केली. तो त्याचा मित्रच होता. हे प्रकरण आग्रा शहरातील सैंया या भागातील आहे. इथं एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. हा मृतदेह 6 जानेवारीला सापडला होता. पोलिसांनी या अनोळखी मृतदेहाची ओळख शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो जितेंद्र नावाचा माणूस असल्याचं कळालं. अजून तपास केल्यावर बरेच धागेदोरे हाती लागले. तेव्हा जितेंद्रचा दोस्त मोनू यामागे असल्याचं उघड झालं.

मोनूची गर्लफ्रेंड त्याला सतत एक स्मार्टफोन मागत होती. मोनू तर एकदम बेरोजगार (unemployed) होता. त्याच्याकडे गर्लफ्रेंडचा हा हट्ट पुरवण्यासाठी अजिबातच पैसे नव्हते. मात्र आपण तिची मागणी पूर्ण करू शकत नाही यामुळं तो अस्वस्थ होता.

यातून मोनूनं हे पाऊल उचललं. मोनूनं आपल्या गर्लफ्रेंडला मोबाईल देण्यासाठी एक प्लॅन बनवला. मोनूचा दोस्त जितेंद्रजवळ स्मार्टफोन होता. मोनूला जितेंद्रचा हा मोबाईल हस्तगत करायचा होता. (Crime) त्यातून मोनूनं आपल्याच एका साथीदाराला या प्लॅनमध्ये सहभागी करून घेतलं आणि जितेंद्रला एक बहाणा बनवून हे दोघं भेटले. या दोघांनी गाफील जितेंद्रला पकडत त्याच्या गळ्याभोवती शर्ट आवळला. त्यात जितेंद्रचा जीव गेला.

मोबाईल घेऊन हे दोघेही पसार झाले. मोनू आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी आता जेलमध्ये टाकलं आहे. जितेंद्रच्या नातेवाईकांनी तो हरवला असल्याची तक्रार 5 जानेवारीला दाखल केली होती. त्यातून त्याच्या हत्येचं प्रकरण उघड झालं.