Woman-commits-suicide-in-Rui

(suicide squadहातकणंगले (Hatkanangaleतालुक्यातील चंदूर येथील शर्मिला नरेंद्र कांबळे (वय25) रा.आभार फाटा, मलाबदे नगर यांनी आज रुई येथील चौगले मळा येथील सुजित चौगुले यांच्या विहिरीत आत्महत्या केली आहे. आज पहाटे 4 च्या सुमारास घरातुन फिरण्यास जातो असे सांगून त्या घराबाहेर पडल्या व त्यानंतर घरी परत आल्या नसल्याने घरातील लोकांनी शोधाशोध केली असता सुजित चौगुले यांच्या विहिरीजवळ त्यांचे चप्पल व ओढणी आढळली. संबंधित महिलेने मूल जगत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची चर्च्या होत आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रुईचे पोलीस पाटील नितीश तराळ व हातकणंगले पोलीस ठाण्याचे पो कॉ. कचरे आले आहेत. या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.(suicide squad