
कोल्हापूर आणि किणी ( हातकणंगले ) नंतर दोन गवे रविवारी सांयकाळी इचलकरंजीच्या दौरावर आले आहेत. हे सायंकाळी शेतातील काम आटोपून घरी परतत असलेल्या शहरालगतच्या नाईक मळा, हेरलगे मळा आणि शाहूनगर परिसरातील शेतकऱ्यांना झाले. यांची माहिती शेतक-यांनी नगरसेवक राजवर्धन नाईक यांना दिली. त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्याच्या बरोबर संपर्क साधून इचलकरंजी शहरालगतच्या मळे भागात दोन गवे आल्याची दिली.
त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यानी गव्यांचा भ्रमण काळ (Cows) असल्याने ते एका ठिकाणी थांबत नाही. शेतकऱ्यांनी शेतात जाताना न घाबरता दोनहून अधिक शेतकऱ्यांनी एकत्रीत हातात काठी आणि रात्रीवेळी बँटरी घेऊन जावे. गवे निघून जात असल्याने त्यांना हुसकावून लावू नये. ते बिथरण्याची शक्यता असल्याने सतर्क रहावे असे आवाहन केले आहे.