The-cowboy

(animal) कोरोची येथील कोथळे यांच्या शेतामध्ये गव्याचे (gava redaदर्शन झाल्याने शेतकऱ्यांच्या मध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोरोची कबनूर तिळवणी साजणी परिसरातील शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे

कोरोची पिराचा माळ परिसरामध्ये कोथळे बंधूंची शेती आहे येथे मंगळवारी सकाळच्या दरम्यान शेताला पाणी देण्यासाठी  मोटर  पंप  चालू करण्याच्या हेतूने  बाबासो पाटील हे गेले असता त्यांना  गवारेडा  शेतामध्ये असल्याचे दिसून आले  त्यामुळे  त्या शेतकऱ्याने याबाबत  पोलीस पाटील  सावकार हेगडे  व ग्रामपंचायतीची संपर्क साधून  गवारेडा आल्याची माहिती दिली त्यानंतर  पोलीस पाटील  मारुती  हेगडे,  ग्रामसेवक आर बि  जाधव , गावकामगार तलाठी  अनंत दांडेकर  यांचेसह अभिनंदन पाटील  आनंदा शेट्टी व परिसरातील शेतकऱ्यांनी  कोथळे यांच्या शेताकडे धाव घेतली  व  याबाबतची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली 

वन विभागाचे  पशुवैद्यकिय अधिकारी डॉ संतोष वाळवेकर,कर्मचारी  अमित कुंभार  भगवान भंडारी  प्रमोद गुरव  यांनी घटनास्थळी भेट देऊन  चिखलामध्ये उमटलेल्या  पावलांच्या ठशाची खातरजमा केली असता ठसे गवारेडयाच्या पावलांचेच  आसल्याच  सांगीतलं वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी (animalपावलांच्या ठशांचा मागोंवा घेतला असता सदरचा गवा हा लक्ष्मी इंडस्ट्रीजच्या बाजूने आल्याचे व पीराच्या माळावरील ओढयातून कबनूरच्या दिशेने गेल्याचे दिसून आले त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये घबराटीचे वातावरण आहे याबाबत वन अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गवारेडयांच्या कळपात दोन नरांच्या मध्ये वर्चस्ववादातून लढाई झाल्यानंतर हरलेल्या नराला कळपातून हुसकावून लावले जाते  अशाच प्रकारे भरकटलेला गवारेडा कोरोची परिसरात आला असण्याची शक्यता आहे त्यामुळे परिसपरातील शेतकऱ्यांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे 

वनविभार बचाव पथकातील कर्मचारी अमित कुंभारसर्वसाधारणपणे यापूर्वी रामलिंग आळते बाहुबली नरंदे खोची या परिसरामध्ये जंगल भाग असल्याने गवारेडे आढळून आले होते परंतु प्रथमच कोरोची परिसरामध्ये गवा रेड्याचे दर्शन झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे