The-Municipal-Council-should-approve

(The bridge) पुलाची शिरोली गावासाठी नगरपरिषद मंजूर व्हावी यासाठी शिवसेनेच्यावतीने नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना निवेदन देण्यात आले.शिरोली गावची लोकसंख्या एमआयडीसीमुळे प्रचंड वाढली आहे. तसेच अनेक परराज्यातून आलेले लोक शिरोली गावातच स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे शिरोली ग्रामपंचायतीला नवीन उपनगरात सेवा सुविधा देताना मर्यादा येत आहेत. म्हणून शिरोली गावाला नगरपरिषदेचा दर्जा देऊन नगरपरिषद मंजूर व्हावी. 

---------------------------------------

Must Read 

1) विद्यापीठातील कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा

2) राज्यात बर्ड फ्लू रोगाबाबत कॅबिनेट मंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती

3) भारताने केलेल्या Air Strike मध्ये 300 दहशतवाद्यांचा मृत्यू

4) एकटी मुलगी 4 दरोडेखोरांशी भिडली

5) Marathi Joke : महापावसाळी आघाडी

---------------------------------------

त्यासाठी ग्रामपंचायतीने शासनाच्या निकषाप्रमाणे सर्व कागदपत्राची पूर्तता संबंधित विभागाकडे केली आहे. शासन स्तरावर मंजुरीसाठीचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे तरी आपण यामध्ये लक्ष घालून शिरोली गावाला नगरपरिषद होण्यासाठी सहकार्य करावे. अशी मागणी माजी आमदार सुजित (The bridge) मिणचेकर, तालुका प्रमुख बाजीराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, शिरोली उपसरपंच सुरेश यादव, यांनी नगर विकास मंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव व पदाधिकारी उपस्थित होते.