ramdas athavle

औरंगाबाद (Aurangabad) जिल्हाचे नाव बदलण्याचा काहीजण अट्टाहास करत आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असे वाद शासनाने (politics)बाजूला ठेवावेत. औरंगाबादचे नाव बदलण्यास रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध असेल, महाविकास आघाडी सरकारने (government) औरंगाबाद नामांतराचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.


--------------------------------------

Must Read

1) एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

2) आमदाराच्या मुलीच्या लग्नात कलेक्टरांचं मारलं पाकीट

3) बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर, दहावीची ३ मेनंतर : शिक्षणमंत्री

4) धक्कादायक! पोलीसच करत आहेत गुंडागर्दी, VIDEO

5) सोन्याची तस्करी चक्क अंडरवेअरमधून

6) अबब... ! करीना कपूर आहे इतक्या कोटींची मालकीण

--------------------------------------


राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. कोरोनाच्या या काळात जनता खडतर दिवसांना सामोरे जात असताना राज्याच्या विकासाचे विधायक मुद्दे बाजूला ठेवून नामांतराचा मुद्दा राज्य सरकारने (government) पुढे आणू नये. 


नामांतराच्या आंदोलनाची आम्ही धग भोगली आहे. त्यामुळे औरंगाबादचे नामांतर कु नये, रिपब्लिकन पक्षाचा त्याला तीव्र विरोध राहील, असे आठवले यांनी रविवारी स्पष्ट केले. छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही आदर्श मानणारे आहोत. मात्र संभाजी महाराजांच्या नावाचा कोणी राजकारणासाठी वापर करु नये, असे मतही आठवले यांनी व्यक्त केले आहे.