अमेरिकेतील न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी, स्टॅंडफोर्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ मॅंचेस्टर असो किंवा ऑस्ट्रेलियातील सिडनी युनिव्हर्सिटी... परदेशांतील अशा नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांचा ओढा दिसून येत आहे. परदेशी शिष्यवृत्तीचा आधार घेत राज्यातील एक हजार तीनशे विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर पदवी, पीएच.डी. आणि व्यवस्थापन क्षेत्रात भरारी घेतली आहे.

-----------------------------------------

Must Read

1) कोल्हापुरातील संवेदनशील 80 गावांत कडेकोट बंदोबस्त

2) शिवसेनेला रोखण्यासाठी नवी सत्ता समीकरणे?

3) महाराष्ट्रातला सर्वात मोठा दरोडा

4) पुणेकरांना खूशखबर,PMPMLच्या ताफ्यात 150 इलेक्ट्रिक बसेस

5) पोलीसदादांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उचलले महत्त्वाचे पाऊल

-----------------------------------------

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात नामांकित शिक्षण संस्थेत शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी २००३ पासून परदेशी शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी तीनशे ‘क्‍यूएस रॅंकिंग’च्या आतील परदेशातील शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना या योजनेतून शिष्यवृत्ती दिली जाते. त्यात विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी व्हिसा, विमानाच्या प्रवास खर्चापासून निवास-भोजन आणि संपूर्ण शैक्षणिक शुल्क देण्यात येते. या वर्षासाठी ७५ विद्यार्थ्यांची परदेशी शिष्यवृत्तीसाठी निवड केली आहे. त्यासाठी राज्य सरकारने २०२०-२१ वर्षासाठी सुमारे ४० कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी पहिल्या  टप्प्यात सुमारे १२ कोटी रूपयांचा निधी समाज कल्याण विभागाला प्राप्त झाला आहे.

परदेशी शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या ज्ञानाचा लाभ देशाला करून देणे आवश्‍यक आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती मंजूर करण्यापूर्वी हमीपत्र लिहून घेतले जाते. अभ्यासक्रम निश्‍चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे अपेक्षित असून, मुदतवाढ किंवा वाढीव खर्च दिला जात नाही. तसेच ज्या विद्यापीठात अभ्यासक्रमास प्रवेश मिळाल्यास ते ठिकाण किंवा अभ्यासक्रम परस्पर बदलल्यास शिष्यवृत्तीची रक्‍कम वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


या अभ्यासक्रमांकडे कल...

  • पदव्युत्तर पदवी : मास्टर ऑफ इंजिनिअरिंग, मास्टर इन आयटी, मास्टर ऑफ सायन्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, पोस्ट ग्रॅज्युएशन इन लॉ, एमएस्सी अकाउटंन्सी अँड फायनान्स, इकॉनॉमिक्‍स अँड फायनान्स, हेल्थ सायकॉलॉजी
  • व्यवस्थापन : मास्टर ऑफ इंटरनॅशनल बिझनेस, एमबीए, मास्टर ऑफ ॲप्लाइज फायनान्स.
  • पीएच.डी. : डॉक्‍टर ऑफ फिलॉसॉफी, डॉक्‍टर ऑफ अँथ्रोपोलॉजी, सोशॅलॉजी, फिजिक्‍स रिसर्च, कॅन्सर सायन्स, ड्रग डिझाइन डेव्हलपमेंट, केमिकल इंजिनिअरिंग, फार्मसी

पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेत सहभागी व्हावे. यासोबतच राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून देशांतर्गत विद्यापीठांमध्ये आयआयटी, एनआयटी, आयआयएम या संस्थांमध्ये शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. या  योजनेमध्येही विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे.