S-T-Directly-on-the-road-divider

(ohio st) ब्रेक निकामी झाल्यानंतर एसटी (ST) चालकाने प्रसंगावधान राखत एसटी थेट रस्ता दुभाजकावरच घातल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या अपघातात एकजण गंभीर तर एकजण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सकाळी 10.30 वाजता जलशुध्दीकरण केंद्राजवळ घडली. मात्र या घटनेने या मार्गावर वाहतूकीचा प्रश्‍न निर्माण होत असल्याचे दिसून आले.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, इचलकरंजी आगाराची एसटी क्र. एमएच 07 सी 9570 ही एसटी नृसिंहवाडी येथून निघाली. हेरवाड, अब्दुललाट मार्गे ती इचलकरंजीत आली. येथील प्रांत कार्यालयात चौकात वळण घेत असताना ब्रेक निकामी झाल्याचे एसटी चालकाच्या लक्षात आले. त्याचवेळी एसटीची सायकलस्वाराला धडक लागल्याने सायकलस्वार गौरय्या अडगुल (वय 65 रा. सांगली रोड) हे किरकोळ जखमी झाले. त्यानंतर एका दुचाकीला एसटीची धडक बसली. 

Must Read 

1) विद्यापीठातील कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा

2) राज्यात बर्ड फ्लू रोगाबाबत कॅबिनेट मंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती

3) भारताने केलेल्या Air Strike मध्ये 300 दहशतवाद्यांचा मृत्यू

4) एकटी मुलगी 4 दरोडेखोरांशी भिडली

5) Marathi Joke : महापावसाळी आघाडी


त्यामध्ये दुचाकीवरील शेखर राजाराम बडगुजर (वय 51 रा. नाट्यगृहाच्या मागे) हे दुचाकीवसह रस्त्यावर पडले. त्यामध्ये बडगुजर यांच्या डोक्याला लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर बसस्थानकाकडे येत असताना रस्त्यावर असलेली वर्दळ, जलशुध्दीकरण केंद्रालगतच असलेली दुकाने, (ohio st) खाद्यपदार्थाचे गाडे, फळविक्रेते यामुळे एसटी चालकाने प्रसंगावधान राखत जलशुध्दीकरण केंद्रासमोर असलेल्या रस्ता दुभाजकावरच एसटी घातली. एसटीची पुढील चाके दुभाजकाच्या पलिकडे जावून एसटी जाग्यावरच थांबली. चालकाने या प्रयत्नामुळे पुढे घडणारा मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर चालकाने तातडीने शहर वाहतूक नियंत्रण शाखा व बसस्थानकात जावून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. माहिती मिळताच शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनि नंदुकमार मोरे व त्यांच्या सहकार्‍यांनीही घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु केले. शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी तसेच बसस्थानकप्रमुख  व अधिकारी घटनास्थळी हजर झाले.