देशातील प्रमुख टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओने (Reliance JIO) नवीन वर्षात ग्राहकांना खास भेट दिली आहे. जिओने 1 जानेवारीपासून देशांतर्गत सर्व नेटवर्कसाठी पुन्हा एकदा कॉलिंग सेवा पूर्णपणे मोफत केली आहे. रिलायन्स जिओने इंटरकनेक्ट युजेस चार्जेस (आययूसी) न आकारण्याचा निर्णय गुरुवारी घेतला.


-----------------------------------------

Must Read

1) कोल्हापुरातील संवेदनशील 80 गावांत कडेकोट बंदोबस्त

2) शिवसेनेला रोखण्यासाठी नवी सत्ता समीकरणे?

3) महाराष्ट्रातला सर्वात मोठा दरोडा

4) पुणेकरांना खूशखबर,PMPMLच्या ताफ्यात 150 इलेक्ट्रिक बसेस

5) पोलीसदादांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उचलले महत्त्वाचे पाऊल

-----------------------------------------


याविषयी माहिती देताना रिलायन्सने स्पष्ट केले की, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या (ट्राय) निर्देशानुसार देशात 1 जानेवारी 2021 पासून Bill and Keep नियम लागू होणार आहे. त्यामुळे आययूसी चार्जेस संपणार आहेत. सप्टेंबर 2019 मध्ये आययूसी चार्जेस आकारण्यास सुरुवात झाली होती. ज्यावेळी ट्राय आययूसी चार्जेस स्वीकारणार नाही त्यावेळी जिओही हे चार्जेस ग्राहकांना लावणार नाही असे रिलायन्स जिओने म्हटले होते.


आता ट्रायने 1 जानेवारीपासून आययूसी चार्ज न आकारण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे जिओनेही ग्राहकांना पुन्हा एकदा विनामूल्य कॉलिंगची सेवा मिळेल असे म्हटले आहे. जिओकडून अन्य नेटवर्पवर कॉल करण्यासाठी आययूसी चार्ज आकारला जातो. यासाठी जिओ दर मिनिटाला 14 पैसे आकारत होती, पण आता ही सेवा विनामूल्य देण्यात येणार आहे.