जुहूमधील इमारतीत बेकायदेशीर (Illegal) बांधकामप्रकरणी  बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. सूदने केलेले अपील आणि अंतरिम अर्ज न्यायालयाने फेटाळला. मेहनती लोकांनाच कायदा मदत करतो, असे म्हणत न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने  सोनू सूदचे अपील फेटाळले. त्यावर सूदच्या वकिलांनी मुंबई पालिकेने बजावलेल्या नोटीसचे पालन करण्यासाठी १० आठवड्यांची मुदत मागितली. 

--------------------------------
Must Read

1) ठाकरे सरकारने आता घेतले 'हे' तीन महत्त्वाचे निर्णय

2) आठ जिल्ह्यात 5 ते 25 मार्चदरम्यान सैन्यभरती

3) ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राज ठाकरे म्हणाले…

--------------------------------

तसेच तोपर्यंत पालिकेला कारवाई न करण्याचे निर्देश द्यावेत, अशीही विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने त्यास नकार दिला. गरज असल्यास पालिकेकडे जा. आता पालिकाच यावर निर्णय घेईल. अनेकवेळा संधी मिळूनही तुम्ही उशीर केलात, असे न्यायालयाने म्हटले. जुहूच्या इमारतीत बेकायदेशीर बांधकामप्रकरणी मुंबई पालिकेने बजावलेल्या नोटिसीला सोनू सूदने उच्च न्यायालयात आव्हान दिले  होते.