निरोगी (Healthy) राहण्यासाठी भरपूर पाणी प्यायले पाहिजे असे नेहमी सांगितले जाते. या पाठीमागची कारणे सुद्धा सांगितली जातात की, खुप पाणी प्यायल्याने किडनी ठिक राहते, चेहरा आणि स्किनवर ग्लो येतो, शरीर हायड्रेट राहते, वजन नियंत्रणात राहते, इत्यादी. मात्र, एका दिवसात किती पाणी प्यावे हे ठोस सांगितले जात नाही. रोज 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे, या गोष्टीची काय सत्यता आहे, या प्रश्नांची उत्तरे जाणून घेवूयात.

--------------------------------
Must Read

1) ठाकरे सरकारने आता घेतले 'हे' तीन महत्त्वाचे निर्णय

2) आठ जिल्ह्यात 5 ते 25 मार्चदरम्यान सैन्यभरती

3) ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राज ठाकरे म्हणाले…

--------------------------------

पाणी पिण्याचे फायदे
1 यूरिन, घामाद्वारे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.
2 शरीराचे तापमान सामन्य राहते.
3 किडनी निरोगी राहते.
4 चेहरा आणि स्किनवर ग्लो येतो.
5 शरीर हायड्रेट राहते.
6 वजन नियंत्रणात राहते.

एका दिवसात किती पाणी आवश्यक ?
एक दिवसात किती पाणी प्यावे, हे तुमचे शरीर, वय, तुमचे काम आणि जीवनशैलीवर अवलंबून आहे. काही लोकांना 8 ते 10 ग्लास पाणीसुद्धा दिवसभरात कमी पडू शकते.

शरीर जेवढे पाणी मागेल तेवढे द्या
हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, शरीर किती पाण्याची मागणी करत आहे, तेवढे पाणी प्या. यामध्ये कंजुषी करू नका. खुप उशीरापर्यंत पाणी प्यायले नाही म्हणून आता प्यायचे हे चांगले नाही. गरजेपेक्षा जास्त पाणी पिऊ नका, यामुळे नुकसान होऊ शकते. शरीरात सोडियमची कमतरता होऊ शकते आणि फुफ्फुसांमध्ये सूज येते.

योग्य प्रमाणात पाणी पित आहात हे कसे ओळखाल
जर तुम्हाला तहान कमी लागत असेल आणि तुमची युरिन सुद्धा हलकी पिवळी किंवा रंगहीन दिसत असेल तर हा संकेत आहे की तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पित आहात. हे सुद्धा एक तथ्य आहे की, पाण्याच्या कमतरतेची लेव्हल केवळ पाणी पिण्यानेच पूर्ण होत नाही तर तुम्ही दिवसभरात जी फळे, भाज्या, चहा, कॉफी, बीयर, एनर्जी ड्रिंग किंवा दुसर्‍या वस्तू घेता, त्यामध्ये सुद्धा पाण्याचा अंश असतो. ते सुद्धा तुमच्या शरीराची पाण्याची मागणी पूर्ण करतात. या साठी तहानेकडे दुर्लक्ष करू नका आणि जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा पाणी प्या. असे यासाठी, कारण प्रत्येक शरीर किंवा व्यक्तीची पाणी पिण्याची गरज वेगवेगळी असते.