For-degree-certificate-till-12th-February

(Education) शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji Vidyapeeth57 व्या दीक्षांत समारंभात पदवी प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्ज भरण्याच्या तारखा विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या आहेत. ऑक्टोबर 2019 व एप्रिल 2020 सत्रातील पदवी व पदव्युत्तरच्या अंतिम सत्राची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रासाठी 13 जानेवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरावयाचा आहे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी केले आहे.

विद्यापीठाचा 57 वा दीक्षांत समारंभात पदवी प्रमाणपत्र ऑनलाईन की ऑफलाईन पाहिजे यासंदर्भात अर्ज भरण्यास 13 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. नियमित शुल्क 250 रूपये भरून 12 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरावयाचा आहे. विलंब शुल्कासह 13 ते 20 फेब्रुवारीपर्यंत 350 रूपये शुल्क भरून अर्ज भरावयाचा आहे. अतिविलंब शुल्कासह 21 ते 28 फेब्रुवारीपर्यंत 850 रूपये शुल्क भरून अर्ज भरावयाचा आहे. पीएच. डी. प्राप्त विद्यार्थ्यांनी 31 मार्चपर्यंत 850 रूपये शुल्क भरून अर्ज भरावयाचा आहे. (Education) ऑनलाईन अर्जाची प्रिंट पूरक कागदपत्रासह परीक्षा विभागात समक्ष किंवा पोस्टाने 10 मार्चपर्यंत जमा करावयाची आहे. दीक्षांत समारंभासंदर्भातील सर्व माहिती www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.