रिलायन्स जिओ (Reliance JIO) कंपनीची अधिकृत डीलरशिप देण्याचे आमिष दाखवून शहरातील एकाला १ कोटी १० लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या चार तरुणांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. आरोपींना न्यायालयाने १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आणखी सहा ते सात जणांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

------------------------------------------

Must Read

1) अभिजित जामदार याला जामीन

2) कोल्हापुरात एका दिवसात 10 नवे कोरोनाबाधित

3) गडकरींनी दिली Fastag बद्दल महत्त्वाची माहिती

---------------------------------------------


शेख इर्शाद शेख फारुख (रा. सईदा कॉलनी), मोहसीन खान गुलाब खान (रा. एन-७ सिडको), तौसीफ खान युसूफ खान (रा. रशीदपुरा) आणि शेख मोहम्मद अमीर मोहम्मद नईमउद्दीन (रा. रहेमानिया कॉलनी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींचा पाचवा साथीदार फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

रहेमानिया कॉलनी येथील शेख मुबारक शेख हबीब अलजबरी यांची घराजवळ जाणाऱ्या नातेवाइकामार्फत आरोपी शेख इर्शाद याच्याशी ओळख झाली होती. तेव्हा इर्शाद हा रिलायन्स कंपनीत नोकरी करत होता. तक्रारदार आणि शहरातील अन्य काही लोकांना त्याने डीलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखविले.