(Politics) ब्राह्मण समाजाबद्दल अपमानास्पद टिपणी करणा-या चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची प्रदेशाध्यक्ष पदावरुन भारतीय जनता पक्षाने हकालपट्टी करावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे (akhil bhartiya brahman mahasangh)अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी केली आहे. पिंपरी-चिंचवड येथे राहणा-या कुलकर्णी यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. 

Must Read 

1) विद्यापीठातील कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा

2) राज्यात बर्ड फ्लू रोगाबाबत कॅबिनेट मंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती

3) भारताने केलेल्या Air Strike मध्ये 300 दहशतवाद्यांचा मृत्यू

4) एकटी मुलगी 4 दरोडेखोरांशी भिडली

5) Marathi Joke : महापावसाळी आघाडी

पत्रकात म्हटले आहे की, कणकवली येथे गुरुवारी झालेल्या सभेमध्ये चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण द्वेषाचे गरळ ओकले आहे.  मुस्लिम बाबराचे नव्हे तर दाते, गोडसे, गाडगीळांचे वंशजच आहेत, अशी अपमानास्पद टिप्पणी करून ब्राह्मण समाजाबद्दल असलेल्या मानसिकतचे प्रर्दशन केले आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ याचा तीव्र शब्दात निषेध करत आहेत. (Politics) स्वत:च्या कर्तृत्वामुळे आपल्या जिल्ह्यातून निवडून न येण्याची खात्री पाटलांना पटली होती. यानंतर सुरक्षित अशा ब्राह्मण बहूल कोथरूड मतदार संघात घुसखोरी केली. ब्राह्मण विद्यमान आमदारांची उमेदवारी कापून आयत्या बिळावरील नागोबासारखे बसले आहेत.

अपमानास्पद टिप्पणी करणा-या चंद्रकांत पाटील यांना आता ब्राह्मण समाज अद्दल घडवणार आहे. भाजपने पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करावी. भाजपने ब्राह्मणानां गृहीत धरण्याची भूमिका या पुढेही सुरू ठेवल्यास पक्षालाही अद्दल घडविण्यात येईल, असा इशाराही पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.