(Transportationशहरातील वाहतुक (Transportation) नियोजन व वाहतुकीच्या समस्या संदर्भात उपाययोजना करण्यासाठी वाहतुक सल्लागार समितीची मंगळवार ता.12 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता दाते मळा परिसरातील रोटरी क्लब येथे बैठक बोलवली आहे. या बैठकीला पोलिस अधिकार्‍यांसह नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, एस.टी. महामंडळ, ट्रान्सपोर्ट, रिक्षा युनियनच्या पदाधिकार्‍यांना निमंत्रण केले आहे.

शहरातील वाहतुकीचे नियोजन व समस्यां संदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यासाठी वाहतुक सल्लगार समितीची स्थापना केली आहे. या समितीकडून वेळोवेळी बैठकी घेतल्या जातात. त्यामध्ये अनेक मुद्यावर चर्चा करून शहरातील वाहतुकीचे नियोजन करण्यासंदर्भात धोरण आखले जाते. मात्र अनेकवेळा त्याचे अनुकरण केले जात नसल्यामुळे शहरातील वाहतुकीचा वारंवार बोजवारा उडल्याचे दिसून येते. वाहतुक सल्लगार समितीमध्ये छोट्या विक्रेत्यांसाठी फेरीवाल्याचे धोरण राबविण्यासाठी सुचना केल्या जातात. (Transportation)  मात्र आजअखेर याचे पालन झाले नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या वाहतुक सल्लागार समितीच्या कार्यपध्दतीबद्दल उलटसुलट चर्चाही होते.

Must Read 

1) विद्यापीठातील कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा

2) राज्यात बर्ड फ्लू रोगाबाबत कॅबिनेट मंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती

3) भारताने केलेल्या Air Strike मध्ये 300 दहशतवाद्यांचा मृत्यू

4) एकटी मुलगी 4 दरोडेखोरांशी भिडली

5) Marathi Joke : महापावसाळी आघाडी

तेव्हा मंगळवार ता. 12 रोजी बोलविण्यात आलेल्या बैठकीवेळी शहरातील वाहतुक सुरळीत करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले जावेत. तसेच बैठकीमध्ये जे निर्णय होतात. त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.

या बैठकीला अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, डीवायएसपी बी.बी.महामुनी, नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्यासह तहसिलदार, विविध पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी आदि अधिकारी, पदाधिकार्‍यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे या बैठकीत कोणता निर्णय घेण्यात येणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहीले आहे.