5-lakh-ransom

(Crime) गुजरीतील एका इमिटेशन ज्वेलरी (Jeweleryदुकानात माझा फोटो का लावला, असा जाब विचारत 5 लाखांची खंडणी दे अन्यथा दुकान फोडेन, अशी धमकी दिल्या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा महिलेसह तिघांवर खंडणीचा गुन्हा नोंद झाला आहे.गुजरीतील एका इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानात मंगळवारी एक महिला खरेदीसाठी गेली होती. तेथे दुकानात तिचा फोटो लावल्याचे दिसून आले. तिने यासंदर्भात दुकानदाराकडे चौकशी केली. यावेळी तो नेटवरून घेतल्याचे सांगण्यात आले. 

--------------------------------

Must Read


1) ठाकरे सरकारने आता घेतले 'हे' तीन महत्त्वाचे निर्णय

2) आठ जिल्ह्यात 5 ते 25 मार्चदरम्यान सैन्यभरती

3) ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राज ठाकरे म्हणाले…

--------------------------------

त्यानंतर या महिलेने दुकानदाराकडे तक्रार केली. दुकानदाराने प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर बुधवारी संबंधित महिला अन्य दोघांना घेऊन या इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानात आली. यावेळी दुकानदाराला न विचारता फोटो का लावला, (Crime) असा जाब विचारत या तिघांनी दुकानदाराकडे 5 लाखांची मागणी केली. तसेच 5 लाखांची खंडणी न दिल्यास दुकान फोडण्याची धमकी दिली. या प्रकरणी बुधवारी रात्री उशिरा महिलेसह तिघांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली.