300-terrorists-killed-in-indian-air-strike-finally

जम्मू-काश्मीरमधील (Jammu kashmir) पुलवामामध्ये (pulwama attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्याद्वारे 26 फेब्रुवारी नियंत्रण रेषा पार करीत पाकिस्तानमध्ये (Pakistan) बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मद नामक दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण शिबिरांच्या ठिकाणांवर 'एअर स्ट्राइक' केला होता. (Balakot airstrike) या बाबत मोठा मोठा खुलासा झाला आहे.

पाकिस्तानातील माजी राजकीय डिप्लोमॅट आगा हिलालीने एका टीवी शोमध्ये स्वीकार केला आहे की; 26 फेब्रुवारी 2019 रोजी बालाकोटमध्ये झालेल्या एअर स्ट्राइकमध्ये तब्बल 300 दहशतवादी मारले गेले.

पाकिस्तानचे माजी राजकीय डिप्लोमॅट यांनी याबाबत सांगितलं की, भारताने आंतरराष्ट्रीय सीमा पार करुन युद्धाप्रमाणे काम केलं. यामध्ये कमीत कमी 300 दहशतवादी मारले गेले होते. आमचं लक्ष्य त्याहून वेगळं होतं. आम्ही त्यांच्या मोठ्या अधिकाऱ्यांवर निशाणा साधला आहे. आमच्याकडून उचललेलं पाऊल पूर्णपणे वैध आहे. कारण तो सैन्याचा माणूस आहे. आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की, या कारवाईत कोणाचा मृत्यू झालेला नाही. आता आम्ही त्यांना सांगितलं, ते जे काही करतील आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ.

हिलाली पाकिस्तानी उर्दू चॅनलवर चर्चेदरम्यान सांगत होते. माजी राजकीय मुत्सद्द्यांकडून ही महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे.

पाकिस्तान सरकारकडून एअर स्ट्राइकचा नकार

भारताने केलेल्या एअर स्ट्राइकला पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारद्वारा नेहमी नाकारलं जातं.