(effect of corona)

दिवसभरात शहरात 291 करोना (Coronavirus) रुग्णांची वाढ झाली असून, पुणे विभागात 902 बाधित (effect of corona)  वाढले आहेत. शहरातील एकूण बाधितांची संख्या 1 लाख 80 हजार 965 झाली असून, पुणे विभागातील बाधितांची संख्या साडेपाच लाखाच्या पुढे गेली असून, ती 5 लाख 69 हजार 248 झाली आहे.

------------------------------------------

Must Read

1) अभिजित जामदार याला जामीन

2) कोल्हापुरात एका दिवसात 10 नवे कोरोनाबाधित

3) गडकरींनी दिली Fastag बद्दल महत्त्वाची माहिती

---------------------------------------------

शहरात दिवसभरात 249 जणांना डिस्चार्ज दिले असून, उपचारानंतर घरी गेलेल्या रुग्णांची  (effect of corona) संख्या 1 लाख 73 हजार 582 झाली आहे. तर जिह्यात 5 लाख 46 हजार 305 जणांना उपचारानंतर घरी सोडले आहे.शहरातील मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 11 असून, त्यातील 5 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

शहरातील एकूण मृत्यू पावलेल्यांची संख्या 4668 आहे. पुणे विभागातील एकूण मृत्यु पावलेल्यांची संख्या 15 हजार 747 आहे.गेल्या चोवीस तासातील शहरातील ऍक्‍टिव्ह रुग्णसंख्या 2715 असून, पुणे विभागात 7196 ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत. शहरात 196 रुग्ण अत्यवस्थ आहेत. तसेच 4555 स्वॅबटेस्ट घेण्यात आल्या.