entertainment- कलाविश्वाने या 2020 वर्षात अनेक कलाकारांना गमावलं आहे. रविवारी ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला असतानाच आता आणि हिंदी टीव्ही मालिकांमध्ये (tv series) काम करणाऱ्या प्रसिद्धी अभिनेत्रीचं निधन (death)झालं आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री दिव्या भटनागर यांचं निधन झालं आहे.
----------------------------------------------------
-------------------------------------------------------
दिव्या भटनागर (tv series) यांना कोरोनाची लागण (corona positive) झाली होती. कोरोनामुळे दिव्या यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची ऑक्सिजन पातळी कमी होती. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर (ventilator) ठेवण्यात आल्याची माहिती आहे. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.