accident


सावळी (ता. मिरज) येथील तानंगकडे जाणाऱ्या रस्त्यावर उसाच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी रस्त्यावरील खडीवरून घसरल्याने महिला रस्त्यावर (accident) पडली. या ट्रॅक्टरखाली सापडल्याने महिलाचा जागीच मृत्यू झाला. सुरेखा नरेंद्र क्षीरसागर (वय ५५, रा. शिपूर, ता. मिरज) असे तिचे नाव असून, महिलेचा पती गंभीर जखमी झाला आहे.

------------------------------------------------------------------

Must Read

1) 'या' जिल्ह्यातील पर्यटनस्थळे उद्यापासून खुली करणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

2) मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्वाचा, घटनापीठसमोर सुनावणी

3) शिक्षण सेवकांची थांबवलेली भरती पुन्हा सुरू होणार !

4) लालबाग सिलिंडर स्फोटप्रकरणी पिता-पुत्रावर मनुष्यवधाचा गुन्हा

5) चार कॅमेऱ्यांचा Vivo Y51 भारतात लॉन्च; अद्ययावत फिचर्ससह बजेट स्मार्टफोन

-------------------------------------------------------------------

शिपूर येथील सुरेखा क्षीरसागर व नरेेंद्र विठोबा क्षीरसागर (५५) हे पती-पत्नी कवलापूर (ता. मिरज) येथील नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते. लग्नसमारंभ आटोपून मंगळवारी सायंकाळी ते मोटारसायकलवरून (क्र. एमएच १० बीएल ५२६७) सावळीमार्गे शिपूरला जात होते, तर उसाने भरलेला ट्रॅक्टर (क्र. एमएच १० एस २४१) कुपवाडहून तानंगमार्गे जात होता. 

क्षीरसागर सावळी-तानंग रस्त्यावर आले असता, त्यांनी ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रस्त्यावर पडलेल्या खडीवरून त्यांची मोटारसायकल घसरली. त्यामुळे पाठीमागे बसलेल्या सुरेखा रस्त्यावर पडल्या व ट्रॅक्टरखाली सापडल्या. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात (accident) नरेंद्र क्षीरसागर गंभीर जखमी झाले.

कुपवाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी त्वरित आयुष हेल्पलाईन टीमला पाचारण करून अपघातील पती-पत्नीला सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु सुरेखा यांचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. गंभीर जखमी झालेल्या पतीवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त केली आहेत. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक फरार झाला आहे.