
1971 च्या भारत आणि पाकिस्तानमधील युद्धात भारताने आपल्या सीमांवर तीन विद्युत मिसाईल तैनात केली होती. त्यानंतर ऑपरेशन ट्रायडेंट अंतर्गत 4 डिसेंबर रोजी 460 किलोमीटर दूर असलेल्या कराचीवर हल्ला करण्याची तयारी सुरू केली होती. पाकिस्तानी हवाई दल रात्री हल्ला करण्यासाठी सक्षम नसल्याने रात्री हल्ला करण्यात येणार होता.
___________________________
Must Read
1) अभिनेता स्वप्नील जोशीचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक
3) हरभजनने केली कोरोना लसीची मस्करी, IPS अधिकाऱ्याने सुनावलं
4) PUBG Mobile India भारतात लॉन्च होणार का नाही? कंपनीने दिलं उत्तर
5) विराटच्या सहाय्यकाचे अखेर विलगीकरण संपले
6) लॉकडाऊनमध्ये सेक्स टॉईजचा बाजार वाढला...हे शहर आघाडीवर...
_____________________________
ऑपरेशन ट्रायडेंट अंतर्गत 4 ते 5 डिसेंबर दरम्यान, पाकिस्तानला जो फटका बसला तो पाकिस्तान कधीच विसरणार नाही. या कारवाईत भारतानं मिळवलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल दरवर्षी याच दिवशी नौदल दिन साजरा केला जातो.
भारतीय नौदलाने या हल्ल्यासाठी इतकी जबरदस्त तयारी केली होती की, पाकिस्तानला जराही हालचाल करण्याची संधी मिळाली नाही. या हल्ल्यात पाकिस्तानच्या तीन युद्धनौका उद्ध्वस्त होऊन समुद्राच्या तळाला गेल्या. तर एक युद्धनौका पूर्णपणे नादुरुस्त झाली.
भारताने थेट कराची बंदरावर हल्ला करत, तिथल्या इंधनाचा साठाच उद्ध्वस्त केला. या कारवाईत भारताचं कसलंही नुकसान झालं नाही. या हल्ल्यात भारताच्या तीन विद्युत मिसाईल जहाजं आणि दोन अँटीसबमरीन कोवर्टनी भाग घेतला होता.
1612 मध्ये स्थापन झालेल्या नौसेनेचं ध्येय वाक्य हे 'शं नो वरुण:'. तैत्तिरीय उपनिषदातील या प्रार्थनेचा अर्थ आहे, 'जलदेवता आमच्यासाठी शुभ ठरो.' असा आहे.
ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या जहाजांच्या रक्षणासाठी ईस्ट इंडिया कंपनी (East India Company) चं नौदल तयार केलं होतं. नंतर याचं नाव रॉयल इंडियन नेव्ही करण्यात आलं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1950 मध्ये राज्य घटना अस्तित्त्वात आली. त्या वेळी नौदलाची नव्याने स्थापना करण्यात आली. त्या वेळी याचं नाव भारतीय नौसेना असं करण्यात आलं.