Salman Khanentertainment center- बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा (Salman Khan) दबंग-3(dabbang-3) चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नव्हता. त्यानंतर आता त्याचा ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ हा चित्रपट येणार असून यामध्ये तो दमदार भूमिका साकारत आहे. या चित्रपटात सलमान खानबरोबर दिशा पटानी (Disha Patani) मुख्य भूमिकेत असून रणदीप हुड्डा, झरिना वहाब आणि  जॅकी श्रॉफ देखील दिसणार आहेत. यामध्ये जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांची महत्त्वाची भूमिका असून ते या चित्रपटात सलमानच्या बॉसची भूमिका करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) या चित्रपटात सलमानच्या बॉसची भूमिका साकारणार आहेत. यामध्ये तो त्यांच्याकडून सल्ले घेताना दिसून येणार आहे. यापूर्वी दोघांनी नुकतेच भारत (Bharat) या चित्रपटात एकत्र काम केलं असून यामध्ये जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांनी सलमान खान याच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता दोघे पुन्हा एकदा ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ मध्ये एकत्र दिसणार आहेत.  

-----------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत जानेवारीमध्ये कोरोना लसीकरणाचे नियोजन

2) मी मात्र कोल्हापूरला परत जाणार' : चंद्रकांत पाटला

3) राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांना फोनवरून दिली धमकी

4) सरकारी नोकरीत अव्वल स्थानी असणारे भारताचे 7 स्टार क्रिकेटपटू

-----------------------------------

या चित्रपटात सलमान जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं सलमान खान (Salman Khan) आणि प्रभुदेवा(Prabhu Deva) ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे. तर भारत सिनेमात  दिसलेली दिशा पटानी (Disha patani) या चित्रपटात सलमानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटातील जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांच्या भूमिकेचे शूटिंग पूर्ण होत आलं असून कर्जतच्या आणि मुंबईच्या स्टुडिओमध्ये त्यांच्या भूमिकेचे शूटिंग पूर्ण झालं आहे. पुढील वर्षी ईदला हा चित्रपट रिलीज होणार आहे. (entertainment center)

दरम्यान, सलमान खान (Salman Khan) सध्या या चित्रपटाच्या शेवटच्या भागाचे शूटिंग पूर्ण करत असून त्याच्याकडे आगामी काळात ‘किक -2’ आणि ‘कभी ईद कभी दिवाली’ हे चित्रपट आहेत. त्यामुळे पुढील काळात सलमानच्या चाहत्यांना आणखी मेजवानी मिळणार आहे. सलमान खान फिल्मच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती सोहेल खान (Sohail Khan) आणि रील लाइफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड करत आहे. त्यामुळं भारत आणि दबंग-3 च्या अपयशानंतर सलमानला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.