Telecom company recharge plan


टेलिकॉम कंपनी (Telecom company) व्होडाफोन-आयडिया(VI) आपल्या ऑनलाइन सिम कार्ड डिलिव्हरी सेवेचा विस्तार करत आहे. यासाठी कंपनीने एक नवीन 399 रुपयांचा डिजिटल एक्सक्लुझिव्ह प्रिपेड प्लॅन (vi recharge plan) आणला आहे. जे ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवरुन ऑनलाइन सिम कार्ड ऑर्डर करतील त्यांच्यासाठी कंपनीने हा प्लॅन आणला आहे.

399 रुपयांचा रिचार्ज प्लॅन :-

399 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 56 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह दररोज 1.5GB डेटा मिळेल. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि प्रतिदिन 100SMS ची सुविधाही आहे. तसंच, या प्लॅनमध्ये युजर्स Vi movies आणि TV चा अ‍ॅक्सेसही मिळेल. हा रिचार्ज प्लॅन Vi च्या सध्याच्या ग्राहकांसाठी ऑनलाइन उपलब्ध आहे. मात्र नवीन ग्राहकांना या प्लॅनचा फायदा ऑनलाइन सिम कार्ड खरेदी केल्यासच मिळेल. त्यामुळे कंपनीने याला ‘डिजिटल एक्सक्लुझिव्ह’ प्लॅन म्हटलं आहे.

----------------------------------------------------

Must Read

1) अजित पवारांनंतर भाजप आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला

2) शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारनं सुरू केली ही नवी योजना

3) सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

4) Facebook वरून मैत्री करून फसवणाऱ्या नागरिकाला अटक

5) ईशा गुप्‍ताच्या बाथरूम सेल्फीने सोशल मीडियावर धुमाकूळ

-----------------------------------------------------------------

Vi ने आणले FRC प्लॅन :- 

Vi ने नवीन रिचार्ज प्लॅन (vi recharge plan) ‘फर्स्ट रिचार्ज’ (FRC) प्लॅनअंतर्गत आणले आहेत. यामध्ये 97 रुपये, 197 रुपये, 297 रुपये, 497 रुपये आणि 647 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचा समावेश आहे. तर, 399 रुपयांचा FRC प्लॅन ऑनलाइन ग्राहकांसाठी आहे. 399 रुपयांच्या FRC प्लॅनशिवाय कंपनीने 299 रुपयांचा FRC प्लॅनही आणला आहे. या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 100SMS ची सुविधा मिळेल.