vivo-y51-launch-in-india

स्मार्टफोन कंपनी विवो (Vivo) ने यूथ वाय सीरीज अंतर्गत Y 51 ला भारतात लॉन्च केलं आहे. या मोबाइलला कंपनीने तरुणाईसाठी बनवला आहे. 5000 एमएएच बॅटरी असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये चार कॅमेरे आहेत. भारतीय बाजारात याची किंमत 17,990 रुपये ठेवण्यात आली आहे. दरम्यान, हा स्मार्टफोन लॉन्च झाला असला तरी अद्याप ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आलेला नाही. तर कंपनीने पाकिस्तान आणि इंडोनेशियामध्ये हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वीच लॉन्च केला आहे.

_________________________

Must Read

1) सूत दरवाढीविरोधात प्रांताधिकाऱ्यांना गाऱ्हाणे

2)भारत बंद : राज्यात कामगार-बँक संघटना, व्यापारी यांचा पाठिंबा... पण

3) विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेमध्ये मोठा गैरप्रकार

4) विराट कोहलीने रचला इतिहास, वाचा काय आहे हा विक्रम

5) Airtelची उत्तम योजना! दररोज 3 जीबी डेटा, फ्री कॉलिंग आणि Disney+ Hotstar VIP कमी किमतीत उपलब्ध

_______________________________

दरम्यान, या स्मार्टफोन्सच्या फिचर्सबाबत बोलायचे झाले तर विवो वाय 51 मध्ये तीन रियर कॅमेरा आणि एक सेल्फि कॅमेरा देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. तर दोन सेंसर कॅमेरे आठ आणि दोन मेगापिक्सलचे आहेत. तसेच सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे. हा स्मार्टफोन कंपनी दोन कलर टायटेनियम सफायर (Titanium Sapphire) आणि क्रिस्टल सिम्फनीमध्ये उपलब्ध करणार आहे.

128 जीबी रोम

विवोच्या या स्मार्टफोनची कपॅसिटी 8 जीबी रॅम आणि 128 जीबी रोम स्टोरेजमध्ये मिळते. यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 6 सीरीज प्रोसेसर आहे, जो कोणत्याही प्रकारटी डाऊनलोडिंग वेगाने करु शकतो. यामध्ये तीन कॉर्ड स्लॉट देण्यात आले आहेत. ज्याच्या सपोर्टमुळे या स्मार्टफोनचं स्टोरेज एक टीबीपर्यंत वाढवता येऊ शकतं. याची बॉटरी 5000 एमएएच एवढ्या क्षमतेची असणार आहे. तसेच 18 वॉट फास्ट चार्ज तंत्रज्ञानासोबत हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. म्हणजेच, हा मोबाईल 64 मिनिटांमध्ये 70 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकतो.

साईड फिंगरप्रिंट सेंसर

एआय पॉवर सपोर्टसोबत येणारा हा स्मार्टफोन एकदा चार्ज केल्यानंतर तुम्ही 14.3 तास ऑनलाईन एचडी मूव्ही पाहू शकता. तसेच 7.26 तास सलग गेमही खेळू शकता. यामध्ये 6.58 इंचाचा हालो फुलव्यू डिस्प्ले आहे. यामध्ये एफएचडी प्लस रिझोल्युशन देण्यात आलेलं आहे. या स्मार्टफोनमध्ये साईड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलं आहे. जे या स्मार्टफोनमधील खास फिचर आहे.

Oppo F15 शी होणार स्पर्धा

Vivo Y51 ची स्पर्धा बाजारातील Oppo F15 सोबत होणार आहे. या फोनमध्ये 6.4 इंच फुल एचडी+ (1080x2400 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 इतका आहे. स्मार्टफोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसोबत देण्यात आला आहे. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरची सुविधा देण्यात आली आहे. हा फोन अॅन्ड्रॉईड 9 पायवर आधारित आहे. यामध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो पी70 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी माली जी72 एमपी3 जीपीयू देण्यात आला आहे. Oppoच्या या फोनमध्ये 8GB रॅम देण्यात आला आहे. हा फोन 18,490 रुपयांना उपलब्ध होतो.