(entertainment) आता वर्ष सरत आलं आहे आणि या वर्षात सर्वाधिक लोकप्रिय झालेल्या ट्विटबद्दल सगळ्यांच्या मनात उत्सुकता असेल. तुमचा अंदाज कोरोनाबाबतच्या (Corona Virus) ट्विटचा असेल, तर तो साफ चुकीचा आहे, यंदा सर्वाधिक आवडणाऱ्या ट्विटचा मान विराट आणि अनुष्काच्या प्रेग्नन्सीच्या (Virat and Anushka) घोषणेनं मिळवला आहे. ट्विटर इंडियानं (Twitter India) त्यांच्या वार्षिक आढाव्यानंतर विराटने अनुष्का प्रेग्नंट असल्याचे केलेलं ट्विट या वर्षीचं सर्वाधिक आवडतं ट्विट ठरल्याचं जाहीर केलं आहे. 27 ऑगस्ट रोजी विराट आणि अनुष्का यांनी इन्स्टाग्राम आणि  ट्विटरवर जानेवारी 2021 मध्ये आपलं बाळ जन्माला येणार असल्याचं सांगितलं. ‘अँड वी आर थ्री! अरायव्हिंग जानेवारी 2021’ अशा कॅप्शनसह दोघांनी आपला एक फोटो शेअर केला होता.

आठ डिसेंबर रोजी ट्विटर इंडियानं विराट-अनुष्काचं हे गोड बातमी देणारं ट्विट यंदा सर्वाधिक रीट्विट झालेलं, लोकप्रिय ट्विट असल्याची घोषणा केली. यंदा #Covid19 हा सर्वाधिक वापरला गेलेला हॅशटॅग (Hashtag) असल्याचं ट्विटरनं जाहीर केलं आहे. बॉलिवूड टॉपिक्समध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांचा दिल बेचारा (Dil Bechara) हा चित्रपट हा सर्वाधिक चर्चेतला विषय होता. तर छोट्या पडद्यावरील बिग बॉस बाबतही (Big Boss) ट्विटरवर चर्चा झाली.  #धिस हॅपंड 2020 ( #ThisHappened2020 ) अंतर्गत दिलेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन, विजय आणि दिवंगत हॉलिवूड स्टार चॅडविक बोसमन (Chadwik Boseman) यांच्याविषयी सर्वाधिक ट्विटस होते.(entertainment)

------------------------------------------------------------------

Must Read

1) 'या' जिल्ह्यातील पर्यटनस्थळे उद्यापासून खुली करणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

2) मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्वाचा, घटनापीठसमोर सुनावणी

3) शिक्षण सेवकांची थांबवलेली भरती पुन्हा सुरू होणार !

4) लालबाग सिलिंडर स्फोटप्रकरणी पिता-पुत्रावर मनुष्यवधाचा गुन्हा

5) चार कॅमेऱ्यांचा Vivo Y51 भारतात लॉन्च; अद्ययावत फिचर्ससह बजेट स्मार्टफोन

-------------------------------------------------------------------

सुशांतसिंह राजपूतच्या दिल बेचारा चित्रपटामुळं हिंदी चित्रपटांविषयी तर मिर्झापूर 2 (Mirzapur 2) आणि बिग बॉस हे टीव्ही आणि वेबविश्वातील सर्वाधिक चर्चेचे विषय ठरले. आंतरराष्ट्रीय वेब सिरीजमध्ये (International  Web Series)लोकप्रिय स्पॅनिश शो मनी हेस्टबाबत (Money Heist) सर्वांत जास्त चर्चा झाली.

भारतीय मनोरंजन विश्वात फेब्रुवारीमध्ये दाक्षिणात्य हिरो विजय याने चाहत्यांबरोबर काढलेला फोटो सर्वाधिक रीट्विट झाला. जुलैमध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर मात केल्याचं ट्विट केलं होतं ते यंदाचं सर्वाधिक कोटेड ट्विट होतं. हॉलिवूडपट ‘ब्लॅकपँथर’मधील (Balck Panther)कलाकार बोसमन यांचं वयाच्या 43व्या वर्षी चार वर्षांच्या कोलन कॅन्सरबरोबरच्या लढाईनंतर ऑगस्टमध्ये निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी देणारं ट्विट भारतात सर्वाधिक वेळा रिट्विट आणि कोट झालं. दिल बेचारा चित्रपट, बिग बॉस, मिर्झापूर 2 सह मनी हेस्ट हा परदेशी शो सर्वाधिक लोकप्रिय विषय ठरला. सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या तीन वेब शोमध्ये मनी हेस्टनं पाहिलं स्थान पटकावलं. बॉलिवूड टॉपिक्समध्ये दीपिका पदुकोणचा छपाक, अजय देवगणचा तान्हाजी : द अनसंग वॉरियर, तापसी पन्नूचा थप्पड आणि जान्हवी कपूरचा गुंजन सक्सेनावरील चित्रपट ट्विटरवर चर्चेत राहिले.

नागीन 4 हा दुसरा सर्वाधिक ट्विटस झालेला टीव्ही शो ठरला. त्यानंतर ये रिश्ता क्या कहलाता है लोकप्रिय शो ठरला. एक जानेवारी ते 15 नोव्हेंबरपर्यंत भारतातील ट्विटर अकाउंटसवर झालेले एकूण रिट्वीटस, लाईक्स आणि कोट ट्विटस यांच्या आकडेवारीवरून हे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.