virat kohli test match catchsports news- पहिल्या कसोटी (test match) सामन्यात एकीकडे भारतीय क्षेत्ररक्षकांनी गचाळ प्रदर्शन केलं. विराट कोहलीनं हवेत झेपवत भन्नाट झेल घेत सहकाऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. अश्विनच्या गोलंदाजीवर विराट कोहलीनं  (virat kohli)कॅमरुन ग्रीनचा भन्नाट झेल घेतला. ४१ व्या षटकांतील तिसऱ्या चेंडूवर कॅमरुन ग्रीन यानं ऑन साइडला फटका मारला. 

पॉईंटवर उभा असलेल्या कर्णधार विराट कोहलीनं (virat kohli) हवेत झेपवत भन्नाट झेल घेतला. संपूर्ण डावात भारतीय खेळाडू झेल सोडत असताना विराट कोहलीनं त्यांच्यासमोर आदर्श ठेवला. कॅमरुन ग्रीन ११ धावा काढून विराटकडे झेल देत माघारी परतला.

----------------------------------------------------

Must Read

1) अजित पवारांनंतर भाजप आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला

2) शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारनं सुरू केली ही नवी योजना

3) सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

4) Facebook वरून मैत्री करून फसवणाऱ्या नागरिकाला अटक

5) ईशा गुप्‍ताच्या बाथरूम सेल्फीने सोशल मीडियावर धुमाकूळ

-----------------------------------------------------------------
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या अॅडलेड कसोटी सामन्यात (test match) रविचंद्रन आश्निच्या गोलंदाजीवर कांगारुंच्या फलंदाजांनी नांगी टाकल्याचं पहायला मिळालं. भारताचा पहिला डाव २४४ धावांवर संपवल्यानंतर ऑस्ट्रेलियाची सुरुवातच खराब झाली. ऑस्ट्रेलियाच्या ९२ धावांवर पाच गडी बाद झाले आहेत. भारतीय गोलंदाजांनी योग्य टप्यावर मारा केला.

ऑस्ट्रेलियाचे अन्य फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत असताना लाबुशेनने एक बाजू लावून धारत भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत आहे. लाबुशेन ४६ धावांवर खेळत आहे. स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमरुन ग्रीन, जो बर्न आणि ट्रविस हेड यांना मोठी खेळी करता आली नाही. भारताकडून अश्विननं तीन बळी घेतले तर बुमराहनं दोघांना माघारी झाडलं.