vijay-mallya-assets-seized

भारतातून फरार झालेला विजय माल्ल्याला (Vijay Mallya) ईडीने (ED) जोरदार झटका दिला आहे. विजय मल्ल्याची फ्रान्समधील १४ कोटींची मालमत्ता ईडीने जप्त करण्यास भाग पाडले आहे. ईडीने स्पष्ट सांगितल्यानंतर फ्रेंच अधिकाऱ्यांनी ही मालमत्ता जप्त केली आहे. (Vijay Mallya Assets Seized)

___________________________

Must Read

1) अभिनेता स्वप्नील जोशीचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक

2) HDFC बँकेला मोठा झटका!

3) हरभजनने केली कोरोना लसीची मस्करी, IPS अधिकाऱ्याने सुनावलं

4) PUBG Mobile India भारतात लॉन्च होणार का नाही? कंपनीने दिलं उत्तर

5) विराटच्या सहाय्यकाचे अखेर विलगीकरण संपले

6) लॉकडाऊनमध्ये सेक्स टॉईजचा बाजार वाढला...हे शहर आघाडीवर...

_____________________________

स्टेट बँके (state bank) सह इतर बँकांचे जवळपास नऊ हजार कोटी रुपये बुडविले आहेत.  त्यानंतर तो परदेशात पळाला. विजय माल्ल्याची आता फ्रान्समधली मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे.  युरो १.६ मिलियन अर्थात सुमारे १४ कोटींची ही मालमत्ता आहे. ही कारवाई केल्यानंतर फ्रान्समधील तपास यंत्रणांने याबाबतची माहिती दिली. दरम्यान, ईडीनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आम्ही फ्रान्समधील तपास यंत्रणांना विजय माल्ल्याची मालमत्ता जप्त करण्याबाबत सांगितले होते. त्यानंतर त्यांनी कारवाई केली आहे, असे ईडीकडून सांगण्यात आले आहे.

जानेवारी २०१९ मध्ये विजय (Vijay Mallya Assets Seized) माल्ल्याला मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट अंतर्गत न्यायालयाने फरार आरोपी घोषित केले. मार्च २०१९ पासून तो लंडनमध्ये वास्तव्य करीत आहे. भारताकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरु आहेत. ब्रिटनमध्ये विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणासंदर्भातला खटला सुरु आहे. याआधी न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती. मात्र या निर्णयाला विजय मल्ल्याच्या वकिलांनी आव्हान दिले. 

तसेच विजय माल्ल्याने ब्रिटन सरकारला शरणार्थी म्हणून आश्रय देण्याचीही विनंती केली. भारत सरकारने याप्रकरणी विशेष बाब म्हणून प्रत्यार्पण मंजूर करावे अशी विनंती केली आहे. विजय माल्याच्या किंगफिशर  (Vijay Mallya Assets Seized) एअरलाइन्सला बँकांच्या समूहाकडून सुमारे ७ हजार कोटींचे कर्ज देण्यात आले होते. व्याज आणि दंड यांची रक्कम मिळून १२ हजार कोटींचा कर्जाचा डोंगर आहे