entertainment center- malaika aroraentertainment center- अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि ग्लॅमरस अदांमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते. बऱ्याचदा तिचे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच मलायका अरोराने (malaika arora) एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओत मलायका अरोराचा योगा पार्टनर पहायला मिळतो आहे. 

मलायका अरोरा ग्लॅमरस फोटोंसोबत तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. ती कधी योगा करताना दिसते तर कधी रस्त्यांवर धावताना पहायला मिळते. नुकतेच तिने योगा करतानाचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत ती एकटी नाही आहे. 

तिच्या या व्हिडीओत तिचा कुत्रा एक्सेलदेखील दिसत आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, माझा योगा पार्टनर एक्सेल. तिच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. क्यूट पार्टनर, हार्ट इमोजी आणि फिटनेससाठी प्रेरणा अशा कमेंट्स पहायला मिळत आहेत. (entertainment center)

----------------------------------------------------

Must Read

1) मोठी बातमी : एल्गार परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली

2) मराठा समाजाला राज्य सरकारचा दिलासा

3) SC, ST विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज!

4) हेअरकटनंतर व्हायरल झाला फोटो, तब्बल 10 वर्षांनंतर झाली कुटुंबीयांची भेट

5) सुरेश रैनाने मागितली माफी, 'त्या' रात्रीची पूर्ण कहाणी समोर

6) मलम लावण्याच्या बहाण्याने तरुणीच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श

--------------------------------------------------------

मलायका अरोरा बऱ्याचदा अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत येत असते. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा २०१७ साली घटस्फोट झाला होता. मात्र मलायका २०१६पासून वेगळी रहायला लागली होती. दोघांना एक मुलगा आहे अरहान खान ज्याची कस्टडी मलायकाला मिळाली आहे.दोघेही वेगळे झाल्यानंतर मलायका (malaika arora) आणि अर्जुन यांच्यातील जवळीक वाढू लागल्याच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली होती.

एका चॅनेलच्या एका मुलाखतीत अर्जुनने मलायकासोबत लग्नाच्या चर्चांवर सांगितले होते की, मला माहित आहे आणि संपूर्ण कुटुंबाला माहित आहे. मी मॅच्युअर आहे जे करेन ते योग्य करेन.