vaccination-planning-january-ichalkaranji-kolhapur

(Ichalkaranji Corona News) कोरोना (Corona) प्रतिबंधक लस देण्यास शहरात जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरवात होण्याची शक्‍यता आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रासह कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्यक्षात आघाडीवर काम करणाऱ्या 937 जणांना लस दिली जाणार आहे. आयजीएम रुग्णालयासह शहरातील सहा प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रातून लस देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक प्रशिक्षण देण्यात येत आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात प्रथम इचलकरंजीत कोरोनाचा संसर्ग जलद वाढला होता. पहिल्या टप्प्यात इचलकरंजीतील मृतदर हा राज्यात जास्त होता. त्यामुळे प्रशासन पातळीवर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या होत्या. यातूनच "आयजीएम'ला कोविड रुग्णालयाचा दर्जा देऊन शासनाकडून या ठिकाणी विविध आरोग्यविषयक सुविधा पुरवल्या होत्या. पालिकेनेही गरजेनुसार स्वतंत्र कोविड केअर सेंटरची उभारणी करून रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले होते. परिणामी कोरोनाचा उद्रेक झाला असला तरी नंतर संसर्गावर जलद नियंत्रणही करण्यात प्रशासनाला यश आले होते. 

Must Read

1) भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मोठा निर्णय...

2) खडसेंमागे ईडी लावली, आता खडसे सीडी कधी लावणार?

3) सिनेसृष्टीला मोठा धक्का! शूटिंगला गेला होता अभिनेता...

4) बापरे! इथं निरोगी लोक जाणूनबुजून कोरोना पॉझिटिव्ह होणार...

5) लग्नाच्या 15 दिवसानंतरच नववधू निघाली 5 महिन्याची गरोदर

सध्या शहरात केवळ 3 कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. संसर्ग पूर्णतः नियंत्रणात आला, मात्र अद्यापही कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे प्रशासन सतर्क आहे. कोरोनाच्या नवीन विषाणूचा धसका सर्वच पातळीवर घेतला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम ही महत्त्वाची आहे. इचलकरंजी पालिकेसह आयजीएम रुग्णालय आणि प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र यांच्याकडून संयुक्तपणे लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्यात येत आहे.

साधारणपणे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरवात होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबवण्यात येणार आहे. (Ichalkaranji Corona News) कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्यक्षात आघाडीवर काम करणाऱ्या आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी, यामध्ये शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय स्टाफ, आशा वर्कर्स, सफाई कर्मचारी अशा 937 जणांना पहिल्या टप्प्यात कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे.

लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत असून, लसीकरणाचेही नियोजन युद्धपातळीवर सुरू आहे. आयजीएम रुग्णालय आणि प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रातून लस देण्याबाबत नियोजन सुरू आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार टप्प्याटप्प्याने नागरिकांना लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी दिली.