
ऊर्मिला मातोंडकर यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट (Instagram account) हॅक करण्यात आल्याची माहिती मातोंडकर यांनी स्वतः यांची ट्विट करून दिली आहे. (Instgram) याबाबत त्यांनी इन्स्टाग्रामकडेही तक्रार नोंदवली आहे. पडताळणी करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करण्यास सांगण्यात आल्या आणि नंतर अकाऊंट हॅक झाले, याबाबत आश्चर्यही त्यांनी व्यक्त केले आहे.
ऊर्मिला मातोंडकर या मागील काही वर्षांपासून त्या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. सुरूवातीला काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली होती. त्यानंतर काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यानंतर त्या राजकारणापासून दूर राहिल्या. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत नव्याने राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली आहे.