urmila-matondkar-will-joins-shiv-sena-today

 विधान परिषदेवरील राज्यपालनियुक्त जागेसाठी शिवसेनेने शिफारस केलेल्या अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) या आज, मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विधान परिषदेवरील राज्यपालनियुक्त जागेसाठी शिवसेनेच्या कोटय़ातून ऊर्मिला मातोंडकर यांचे नाव महाविकास आघाडी सरकारने पाठवले होते. त्यानंतर आता मातोंडकर मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करतील, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना स्पष्ट के ले.

मंगळवारी सायंकाळी ४ वाजता जुहू येथे  (Urmila Matondkar joins Shiv Sena today) पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याचे ऊर्मिला मातोंडकर यांनी जाहीर केले मातोंडकर यांनी गेल्या वर्षी काँग्रेस पक्षाच्या वतीने उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. परंतु त्यांचा तेव्हा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षातील गोंधळावर बोट ठेवत पक्षाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसच्या राजीनाम्यानंतर त्या राजकारणात सक्रिय नव्हत्या.