(Crime) पंचगंगा नदीवरील (Panchganga riverदशक्रिया घाटाजवळील पत्रात  सकाळी दहा वाजता अज्ञात  पुरुष व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मासे पकडण्याच्या गळाने मृतदेह काठावरील एका दगडाला बांधला होता. ही आत्महत्या की खून याचा तपास पोलीस करत आहेत. अंदाजे वय ५० ते ५५ असलेल्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. 

नदी घाटावर दशक्रिया करण्यासाठी लोक आले होते. त्यांना हा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. याचवेळी शिवाजी पुलावर आरोग्य निरीक्षक राजेंद्र पाटील मास्क न लावणाऱ्या लोकांवर कारवाई करत होते. मृतदेह पाहिलेल्या लोकांनी त्यांना ही घटना सांगितली. (Crime) त्यांनी तात्काळ अग्निशमन दल व लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ पोलीस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. 

Must Read

1) कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले

2) भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी!

3) अपुरी झोप तुमच्या किशोरवयीन मुलांना देतेय डिप्रेशन

4) मोबाइल चार्जिंगला लावताना तुम्हीही 'या' चुका करत असाल, तर...

5) प्रेग्नंट अनुष्का शर्मानं पहिल्यांदाच व्यक्त केली खंत

6) जगातील सुंदर महिलांपैकी एक असणाऱ्या मानुषी छिल्लरचा BOLD अंदाज


पोलिसांनी पंचनामा केला. करवीर पोलीस उपाधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर व करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर यांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली. पंचनामा झाल्यावर अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह नदीतून बाहेर काढला. व शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये पाठवला. मृतदेह कोणाचा आहे. ही आत्महत्या आहे की हत्या आहे. या सर्व गोष्टींचा उलगडा शवविच्छेदनानंतर  होईल अशी माहिती डॉ. अमृतकर यांनी दिली.