CM Uddhav Thackeraypolitics news- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे ग्राम पंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेची रणनीती (Maharashtra Gram Panchayat election) आखत आहेत. त्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल जिल्हा प्रमुखांशी चर्चा (Shiv Sena meeting)  करुन ग्राम पंचायत निवडणुकीत शिवसेनेला नंबर वन करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत संपर्कप्रमुखांना रणनीती बनवण्याचे आदेश दिले आहे.  ‘वर्षा’ बंगल्यावर शिवसेनेची खलबतं सुरु आहेत. (CM Uddhav Thackeray takes active part in Gram Panchayat election )

------------------------------------------------

Must Read

1) ग्रामपंचायत बिनविरोध करा अन् पंचवीस लाख रूपये मिळवा! आमदारांची ऑफर

2) मोठी घडामोड, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र

3) रस्त्यात गाडी थांबवून शरद पवारांनी दिले आशीर्वाद

4) ब्लॅकमेल करत तब्बल 21 वर्षे केलं लैंगिक शोषण आणि त्यानंतर...

5) MIM च्या नेत्याने तिघांना घातल्या गोळ्या VIDEO


--------------------------------------------------------

दरम्यान आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व शिवसेना (Shiv Sena meeting) संपर्कप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणनीती   ठरवण्यात आली. शिवसेना महाराष्ट्रातील 14 हजार 234 ग्राम पंचायतींच्या निवडणुका लढवणार आहे. राज्यातील ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होत आहे. तब्बल 34 जिल्ह्यातील 14 हजार 234 गावातील ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. त्यासाठी शिवसेनेनं कंबर कसली आहे. सर्व ग्रामपंचयातीत शिवसेनेनं त्यांच्या संपर्कप्रमुखांना रणनीती आखून सतर्क केलं आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी “शिवसेना पक्ष हा आता सत्तेत आहे. त्यामुळे सरकारी योजना तळागळा पर्यंत पोहोचवा” असे आदेश संपर्कप्रमुखांना दिले आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना (Shivsena) हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला पाहिजे, त्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरा, असे आदेश उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले आहेत. सर्वाधिक ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना त्यांनी पूर्ण ताकद लावण्यास सांगितले. (Gram Panchayat Election Uddhav Thackeray orders Shivsena leaders)

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शुक्रवारी शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना मार्गगर्शन केले. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी जोमाने काम करा, लोकोपयोगी कामं करुन जनतेचा विश्वास संपादन करा, संपर्कमंत्री आणि पालकमंत्र्यांशी समन्वय राखा आणि एकजुटीने निवडणुकांना तोंड द्या, असं यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

ग्राम पंचायत निवडणूक (politics news) कार्यक्रम

एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित सुमारे एकूण 14,234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम संगणकीकृत पद्धतीनं राबविणार असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. कोरोनाच्या साथीच्या आजाराच्या संसर्गाची गंभीर परिस्थिती उद्भवल्यानं मार्च 2020मध्ये सुमारे 1566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका निवडणूक आयोग्याच्या आदेशानुसार 17 मार्च 2020ला स्थगित करण्यात आल्या होत्या.

आता निवडणूक आयोगानं 20 नोव्हेंबर 2020च्या आदेशान्वये एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमानुसार संबंधित जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार 1 डिसेंबर 2020 रोजी सुमारे 14234 ग्रामपंचायतींसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, 7 डिसेंबर 2020पर्यंत त्यावर हरकती घेण्यात आल्या आहेत. 9 डिसेंबरच्या सुधारित कार्यक्रमानुसार अंतिम मतदारयादी 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

ग्राम पंचायत निवडणुकीच्या तारखा

1 डिसेंबर 2020 – मतदारयादी प्रसिद्ध

7 डिसेंबर 2020 – हरकती

9 डिसेंबर 2020 – अंतिम मतदारयादी  तयार करणे

14 डिसेंबर 2020 रोजी – अंतिम मतदारयादी प्रसिद्ध

23 ते 30 डिसेंबर 2020 – नामनिर्देशनपत्रे

31 डिसेंबर 2020 -अर्जांची छाननी

4 जानेवारी – अर्ज माघार घेण्याची मुदत

15 जानेवारी 2021 – प्रत्यक्ष मतदान

18 जानेवारी 2021 – निवडणूक निकाल