two-motorcycle-thieves-arrested-kolhapur

(Kolhapur Crime) शहर परिसरातून मोटारसायकल चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना जुना राजवाडा पोलिसांनी (Old Palace Police) अटक केली. गणेश सुरेश आसगांवकर (वय 21, मूळ रा. मंगळवार पेठ, सध्या लक्षतीर्थ वसाहत) आणि शोहेब बाबासाहेब मालदार (वय 30, रा. लक्षतीर्थ वसाहत) अशी त्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून पावणे चार लाख रूपये किमंतीच्या 12 मोटारसायकली जप्त केल्या. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, शहरातील मोटारसायकल चोरीचे प्रकार वाढले होते. याचा तपास करताना गुन्हे शोध पथकाला संशयित चोरटा गणेश आसगांवकर हा लक्षतिर्थ वसाहत येथील मंदिराजवळ चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतला. चौकशीत त्याने त्याच्याकडील मोटारसायकल चोरीची असल्याची माहिती दिली. त्यानंतर त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यात त्याने रंकाळा टॉवर, अंबाई टॅंक, खासगाब खाऊ गल्ली, मध्यवर्ती बसस्थानक अशा ठिकाणाहून मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. 

या मोटारसायकल साथिदार संशयित शोहेब मालदारच्या माध्यमातून विक्री केल्याचे सांगितले. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या दोघांकडून 3 लाख 70 हजार रूपये किंमतीच्या 12 मोटारसायकली जप्त केल्या. त्यांच्याकडून जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील आठ, लक्ष्मीपुरी व शाहूपुरी पोलिस ठाण्यातील प्रत्येकी दोन गुन्हे उघडीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले. (Kolhapur Crime) ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश पाटील, सहायक फौजदार विजय कोळी, कर्मचारी अनिल ढवळे, प्रकाश संकपाळ, रमेश डोईफोडे, योगेश गोसावी, प्रदीप पाटील, शाहू तळेकर, परशराम गुजरे, संदीप बेंद्रे यांनी केली.   

जुनी मोटारसायकल खरेदी करताना घ्या काळजी... 
चोरीची मोटारसायकल विक्री करताना चोरटे ग्राहकांकडून ऍडव्हान्स घेतात. कागदपत्रे नंतर आणून देतो मग व्यवहार करू असे सांगतात. आर्थिक अडचण सांगून ते वाहन गहाण ठेऊन पैसे घेतात आणि निघून जातात. परत भेटत नाहीत. त्यामुळे जुने वाहन खरेदी करताना कागदपत्राची व मालकाची खात्री केल्याशिवाय खरेदीचा व्यवहार करू नका असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.