anil kapoorentertainment center- बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आणि अनिल कपूर हे दोघंही सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (viral on social media)झाला आहे.

यामध्ये अनिल कपूर अनुराग कश्यपला बॉलिवूडचा सर्वात मोठा फ्रॉड असं म्हणतो. त्यानंतर रागवलेल्या अनुरागने त्याच्या तोंडावर पाणी फेकलं. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (viral on social media) होत आहे.

__________________________

Must Read

1) सूत दरवाढीविरोधात प्रांताधिकाऱ्यांना गाऱ्हाणे

2)भारत बंद : राज्यात कामगार-बँक संघटना, व्यापारी यांचा पाठिंबा... पण

3) विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेमध्ये मोठा गैरप्रकार

4) विराट कोहलीने रचला इतिहास, वाचा काय आहे हा विक्रम

5) Airtelची उत्तम योजना! दररोज 3 जीबी डेटा, फ्री कॉलिंग आणि Disney+ Hotstar VIP कमी किमतीत उपलब्ध

_______________________________

खरंतर हा व्हिडीओ नेटफिल्क्सवर (netflix) प्रदर्शित होणाऱ्या Ak Vs Ak चा आहे. ट्रेलरमध्ये हा वाद नक्की कशामुळे झाला हे समजलेलं नसलं तरी चाहत्यांची उत्सुकता मात्र शिगेला लागली आहे. त्यांची खरंच भांडणं झाली आहेत का? आणि नक्की कशावरुन भांडणं झाली आहेत हे समजणं कठीण जात आहे. ट्रेलरची सुरुवात होते तेव्हा ते एकमेकांशी गप्पा मारताना दिसतात.(entertainment center)


नुराग आणि अनिल कपूर एकत्र मिळून एक फिल्म बनवत आहेत. ज्यामध्ये सोनम कपूरचं अपहरण झाल्याचं दाखवण्यात येतं. आणि अनुरागने अनिल कपूरला फक्त दहा तासांचा अवधी दिलेला असतो. या दहा तासांमध्ये अनिल कपूरला आपल्या मुलीला शोधायचं असतं. आता सोनमचा शोध लागतो का हे पाहणं औत्सुक्याचं आहे. या फिल्ममध्ये अनिल कपूर, अनुराग कश्यप, सोनम कपूर सह (Sonam Kapoor) बोनी कपूर यांनीही काम केलं आहे.

या फिल्मचं दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवाने यांनी केलं आहे. त्यांनी यापूर्वी  2018मध्ये प्रदर्शित झालेला ‘भावेश जोशी’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. AK vs AK हा चित्रपट 24 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) हा सिनेमा प्रदर्शित होईल.