sports news- न्यूझीलंडचा ( New Zealand)अष्टपैलू खेळाडू कोरी अँडरसन यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे. यापुढे कोरी अँडरसन न्यूझीलंड संघाकडून खेळताना दिसणार नाही. मागील दोन वर्षांपासून अँडरसन एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकला नाही. अँडरसनची प्रेयसी अमेरिकन आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर त्यानं अमेरिकेा टी 20 लीगमध्ये खेळण्याचा निर्णय (retirement)घेतला आहे. त्यामुळे २९ वर्षीय अँडरसन यापुढे कदाचीत अमेरिका संघाकडून आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळू शकतो.
1) विधान परिषद निवडणूक : भाजपला धक्का
2) फ्रान्समधली विजय माल्याची १४ कोटींची मालमत्ता जप्त
3) हा स्टार खेळाडू T-20 सीरिजमधून बाहेर
4) मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी, या दिवशी न्यायालयात होणार सुनावणी
न्यूझीलंडसाठी प्रतिनिधित्व केलं ही माझ्यासाठी गर्वाची बाब आहे. मला अद्याप खूप क्रिकेट खेळायचं होत पण काही गोष्टींमध्ये शक्य नाही झालं. न्यूझीलंड क्रिकेटने माझ्यासाठी जे काही केले त्याचे मी कौतुक करतो ‘ अशी पहिली प्रतिक्रिया एंडरसनने निवृत्तीनंतर (retirement) क्रिकबझला दिली. (sports news)
अँडरसनने ४९ एकदिवसीय, ३० टी २० आणि १३ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकदिवसीय सामन्यात एक हाजर १०९ धावा काढल्या आहेत. तर टी-२० मध्ये २८५ आणि कसोटीमध्ये ६८३ धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात अँडरसनने न्यूझीलंडकडून सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. त्यानं फक्त ३६ चेंडूत शतकी खेळी केली होती. दरम्यान, अँडरसनने अमेरिकेत होणाऱ्या टी 20 स्पर्धेसाठी खेळण्याचा निर्णयासोबतच तीन वर्षांचा करार केला असल्याची माहिती आहे.