(Crime News) नागपूरमध्ये  सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Courtसरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या परिवाराची अडीच कोटी रुपयांना फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद बोबडे (Sharad Bobadeयांच्या आई मुक्ता बोबडे या बऱ्याच वृद्ध आणि आजारी असल्याचा फायदा घेत आरोपीने फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे.

बोबडे कुटुंबीयांची शहरातील आकाशवाणी चौकात वडिलोपार्जित स्थावर संपत्तीवर सीझन लॉन उभारण्यात आले आहे. या लॉनची मालकी ही मुक्ता बोबडे यांच्या नावावर आले.  हा लॉन चालवण्यासाठी तापस घोष याला दिला होता. गेल्या 10 वर्षांपासून तापस घोष आणि त्यांची पत्नी हा लॉन चालवत होते. पण घोष याने लॉनच्या भाडेपोटी मिळणाऱ्या रक्कमेमध्ये बनावट पावत्या तयार करून हिशेबामध्ये हेराफेरी  केली.

------------------------------------------------------------------

Must Read

1) 'या' जिल्ह्यातील पर्यटनस्थळे उद्यापासून खुली करणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

2) मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्वाचा, घटनापीठसमोर सुनावणी

3) शिक्षण सेवकांची थांबवलेली भरती पुन्हा सुरू होणार !

4) लालबाग सिलिंडर स्फोटप्रकरणी पिता-पुत्रावर मनुष्यवधाचा गुन्हा

5) चार कॅमेऱ्यांचा Vivo Y51 भारतात लॉन्च; अद्ययावत फिचर्ससह बजेट स्मार्टफोन

-------------------------------------------------------------------

खोटी बिलं व पावती बनवून घोष याने मुक्ता बोबडे यांची फसवणूक केली आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.  हे प्रकरण संवेदनशील असल्याने फसवणूक केल्या प्रकरणी सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोबडे कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी तापस घोष याला पोलिसांनी अटक केली असल्याचे पोलीस उपायुक्त विनिता साहू यांनी सांगितले.