sports news- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारतीय टीमने (India vs Australia) लाज घालवणारी कामगिरी केली आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये (test cricket) भारताचा फक्त 36 रनवर ऑल आऊट झाला आहे. टेस्ट क्रिकेटमधली भारताची ही निच्चांकी धावसंख्या आहे. याआधी इंग्लंडविरुद्ध 1974 साली भारताचा 42 रनवर ऑल आऊट झाला होता.

-------------------------------------------------

Must Read

1) ग्रामपंचायत बिनविरोध करा अन् पंचवीस लाख रूपये मिळवा! आमदारांची ऑफर

2) मोठी घडामोड, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र

3) रस्त्यात गाडी थांबवून शरद पवारांनी दिले आशीर्वाद

4) ब्लॅकमेल करत तब्बल 21 वर्षे केलं लैंगिक शोषण आणि त्यानंतर...

5) MIM च्या नेत्याने तिघांना घातल्या गोळ्या VIDEO

--------------------------------------------------------

ऑस्ट्रेलियाकडून जॉस हेजलवूडने 5 तर पॅट कमिन्सने 4 विकेट (test cricket) घेतल्या. भारताकडून चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि रविचंद्रन अश्विन शून्य रनवर आऊट झाले. तर पृथ्वी शॉ 4, मयंक अगरवाल 9, जसप्रीत बुमराह 2, विराट कोहली (virat kohli) 4, हनुमा विहारी 8 रन, ऋद्धीमान साहा 4 रनवर आऊट झाले. तर मोहम्मद शमी रिटायर्ड हर्ट झाला. या इनिंगमध्ये टीम इंडियाच्या एकाही खेळाडूला दोन आकडी संख्या गाठता आली नाही. भारताचा 36 रनवर ऑल आऊट झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 90 रनचं आव्हान मिळालं (sports news)आहे.

टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या भारताने पहिल्या इनिंगमध्ये 244 रन केले यानंतर भारताच्या बॉलरनी दिमाखदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा 191 रनवर ऑल आऊट केला, त्यामुळे भारताला 53 रनची आघाडी मिळाली.