Telegram App


इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा वापर जगभरात अनेक युजर्सकडून केला जातो. यामध्ये अनेक शानदार फिचर्स आहेत, पण असे काही फिचर्स Telegram App मध्ये आहेत जे तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मिळत नाहीत. प्रायव्हसी हा त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा. याच कारणामुळे Telegram ला अनेकांची पसंती असून व्हॉट्सअ‍ॅपसोबतच Telegram चीही डिमांड दिवसेंदिवस वाढतेय.

आता Telegram App मध्ये नव्या वर्षात मोठे बदल होणार आहेत. जर तुम्ही Telegram चा वापर करत असाल तर पुढील वर्षापासून या अ‍ॅपच्या वापरासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागू शकतात. कारण, Telegram पुढील वर्षापासून ‘पे फॉर सर्विस’ सुरू करणार आहे. कंपनीचे फाउंडर पावेल दुरोव (Pavel Durov) यांनी याबाबत माहिती दिली. पण, ही पेड सेवा केवळ बिजनेस युजर्ससाठीच असेल. सामान्य युजर्स नेहमीप्रमाणेच फ्रीमध्ये या अ‍ॅपचा वापर करु शकतील. “टेलिग्राम प्लॅटफॉर्म विकण्याचा अजिबात विचार नाहीये, पण फंडिंगसाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या जे फिचर्स आहेत ते युजर्ससाठी मोफतच राहतील”, असं पावेल दुरोव यांनी सांगितलं.

---------------------------------------
Must Read

1) नृसिंहवाडीतील दत्त जयंती सोहळा रद्द

2) ...आणि 'पवारांचे पाय चाटायला कोण गेलं होतं?'

3) Two wheeler : नवीन वर्षात दुचाकी महागणार

4) 2021 च्या वर्षात सर्वाधिक वेळा 'वीकएंड'लाच येणार संकष्टी चतुर्थी

-----------------------------------------

आपल्या युजर्ससाठी (users) टेलिग्राम नव्या वर्षात अनेक नवीन फिचर्स लाँच करणार आहे. ग्रुप चॅटला रिप्लाय, मेंन्शन स्मार्ट नोटिफिकेशन, अ‍ॅडव्हान्स पोल्स, अ‍ॅडमिन टूल, ग्रुप स्टॅटिक्स यांसारखे फिचर्स आणेल. नवीन व्हॉइस चॅट फिचरही कंपनी टेलिग्रामसाठी लवकरच लाँच करणार आहे. सध्या या अ‍ॅपचे जगभरात जवळपास 500 मिलियन अ‍ॅक्टिव्ह युजर झाले असून आता नवीन फिचर्स आणि बिजनेस कायम ठेवण्यासाठी कंपनी युजर्सकडून शुल्क आकारणार आहे.