strict-restrictions-in-karnataka-state-from-december-20

 देशात कोरोनामुक्त (Coronavirus) होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत गेल्या 10 दिवसांमध्ये मोठी वाढ झाली आहे. तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारनं (Karnataka) मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे कर्नाटक राज्यात येत्या 20 डिसेंबरपासून कडक निर्बंध (Strict restrictions) घालण्यात येणार आहेत. त्याचबरोबर नववर्ष साजरे करण्यावरही सरकारनं बंदी घालण्याच्या तयारीत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं कर्नाटक राज्य सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.


दिवाळीनंतर कर्नाटक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं ठोस पाऊल उचलण्यास सुरूवात केली आहे. विवाह समारंभ, अंत्यसंस्कारावरही कर्नाटक सरकारचं निर्बंध असणार आहे. याबाबत मार्गदर्शन सुचना लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.

देशात फेस्टिव्ह सीझन सुरु आहे. ख्रिसमस (Christmas) आणि न्यू ईयर सेलिब्रेशन तोंडावर आलं आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. कर्नाटक सरकारनं नववर्षाच्या स्वागतासाठी करण्यात येणाऱ्या सार्वजनिक उत्सवावर निर्बंध लादण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, कर्नाटकात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती तज्ज्ञांनी वर्तवली आहे. 2021च्या सुरुवातीला कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचं शक्यता आहे. त्यात नववर्षाच्या सेलिब्रेशनमुळे कोरोनाचा धोका आणखी वाढू शकतो. या पार्श्वभूमीवर सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.

दरम्यान, सध्या कोरोना विषाणूची दुसरी लाट तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर, ज्या भागात कोरोनाचा संसर्ग अधिक आहे, त्या भागात 12 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांसह सर्वांनी फेसमास्क वापरणं अनिवार्य आहे. दुकाने, कार्यालये, शिक्षण संस्था अशा ठिकाणी वातानुकुलन यंत्रणा बंद असेल तर मास्क लावणे अत्यावश्यक आहे, असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे.

हवेमार्फत कोरोनाव्हायरस पसरण्याचा धोका


कोरोनाग्रस्त (coronavirus) व्यक्ती शिंकताना, खोकताना त्या व्यक्ती अधिक संपर्कात आल्यास तसंच त्या व्यक्तीनं शिंकताना, खोकताना तोंडावर ठेवलेला हात इतर वस्तूंना लावल्यास आणि त्या वस्तूंना इतर व्यक्तींनी स्पर्श केल्यास किंवा ती व्यक्ती शिंकताना, खोकताना त्याचे थेंब पृष्ठभागावर पडून तिथं दुसऱ्या व्यक्तीचा स्पर्श झाल्यास... अशा पद्धतीनं कोरोनाव्हायरस पसरत जातो. मात्र आता हवेमार्फत पसरणाऱ्या कोरोनाचा (Aerosolised Coronavirus) धोकाही नाकारता येत नाही. म्हणजे कोरोनाव्हायरस असलेले तोंडातील ड्रॉपलेट्स हवेत विशिष्ट कालावधीसाठी राहतात आणि विशिष्ट ठिकाणापर्यंत तरंगत जातात. ज्यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढू शकतो. या कोरोनाचा नाश कसा करायचा असा प्रश्न उपस्थित होतो.

सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग राखलं जातं. मात्र घरामध्ये ते शक्य नाही. अशावेळी एरोसोलमध्ये असलेल्या कोरोना विषाणूला मारण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट लायटिंगचा C (UVC) उपयोग होऊ शकतो असं नव्या संशोधनातून लक्षात आलं आहे.

सूक्ष्मजीवांना मारण्यासाठी शतकांपासून नेहमीची यूव्हीसी प्रक्रिया वापरली जाते पण त्यामुळे मोतीबिंदू किंवा त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोका असतो. मात्र त्या तुलनेत कमी क्षमतेची far-ultraviolet C (UVC) सुरक्षित असल्याचे पुरावे संशोधकांना सापडले आहेत. कमी क्षमतेचं फार-अल्ट्राव्हायोलेट लायटिंग C (UVC) वापरल्यास खोलीतील हवा निर्जंतुक करता येऊ शकते ज्यामुळे रुममध्ये व्हेंटिलेशनमुळे होणाऱ्या निर्जंतुकीकरणाच्या तुलनेत 50 ते 85 टक्क्यांची वाढ होऊ शकते असं कॉमप्युटेशनल मॉडेलिंगच्या माध्यमातून लक्षात आलं आहे. सायंटिफिक रिपोर्ट्स या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे.

कोरोना लसीकरणासाठी नावनोंदणीस प्रारंभ


दुसरीकडे, दिल्लीत कोरोना लसीकरणासाठी नावनोंदणीस प्रारंभ झालं आहे. सरकारनं कर्मचार्‍यांची माहिती मागितली आहे.

दिल्ली सरकारनं आरोग्य कर्मचाऱ्यांची कोरोना लसीकरणासाठी नावनोंदणी सुरू केली आहे. शासनाने आरोग्य संस्था, नर्सिंग होम, ओपीडी आणि क्लिनिक यांना त्यांच्या कर्मचार्‍यांची नावे नावनोंदणीसाठी पाठविण्यास सांगण्यात आलं आहे.