stop-shivsena-dominated-possibility-shiye-kolhapur-new-changes

(Kolhapur Politics) येथे सत्ताधारी शिवसेनेचा वारू रोखण्यासाठी नवीन सत्ता समीकरणे तयार होण्याची शक्‍यता आहे. यासाठी स्थानिक गट एकत्रित येऊन सत्ताधारी आघाडीला शह देण्यासाठी एकास एक अशी लढत घडवून आणतील. शिवसेनेनेही अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. शिवसेनेचे (Shiv Senaजिल्हा उपप्रमुख व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव पाटील सत्ताधारी आघाडीच्या केंद्रस्थानी आहेत, तर तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष सर्जेराव काशीद विरोधी बाजूने मोर्चेबांधणी करीत आहेत.   

शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या ठिकाणी शिवसेना स्वबळावर, तर काही प्रभागात महाविकास आघाडीच्या प्रयोगात शिवसेना पुन्हा सत्तेत राहील अशी शक्‍यता सत्ताधारी आघाडीत वर्तवली जात आहे. शिये जिल्हा परिषद मतदारसंघात २०१२ ते २०१७ या कालावधीत बाजीराव पाटील, २०१७ नंतर शिवसेनेच्या जि. प. सदस्या मनीषा कुरणे यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर सत्ता राखण्याचा प्रयत्न शिवसेना करेल. मात्र, दुरंगी लढत झाल्यास अटीतटीचा सामना होणार आहे. 

काही दिवसात गोकुळ, व छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणुका होणार आहे. यात महाविकास आघाडीचा प्रयोग होणार असल्याने ग्रामपंचायतीची समीकरणे बदलणार आहेत. (Kolhapur Politics) यामुळे आमदार पी. एन. पाटील गटाचे, माजी आमदार महादेवराव महाडिक गटाचे व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्रित येण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे, तर शिवसेनेसोबत मंत्री सतेज पाटील गटाचे काँग्रेस कार्यकर्ते जुळवून घेण्याची 

शक्‍यता आहे. 

शेतकरी संघटनेचे ॲड. माणिक शिंदे यांनी अतिक्रमणधारक इच्छुक उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने इच्छुक असणारे अतिक्रमणधारक संकटात सापडले आहेत. 

दृष्टिक्षेपात...

  •  लोकसंख्या  : ९५०३ 
  •  मतदार : ६३५२ 
  •  प्रभाग : ६
  •  सदस्य : १७