___________________________
Must Read
1) अभिनेता स्वप्नील जोशीचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक
3) हरभजनने केली कोरोना लसीची मस्करी, IPS अधिकाऱ्याने सुनावलं
4) PUBG Mobile India भारतात लॉन्च होणार का नाही? कंपनीने दिलं उत्तर
5) विराटच्या सहाय्यकाचे अखेर विलगीकरण संपले
6) लॉकडाऊनमध्ये सेक्स टॉईजचा बाजार वाढला...हे शहर आघाडीवर...
_____________________________
सांगितले जात आहे की, भारताचा डाव असताना शेवटच्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क (Michelle stark) चा वेगवान चेंडू रवींद्र जडेजाच्या हेल्मेटला लागला. बॉल हेल्मेटला लागल्यानंतर डाव संपताच बीसीसीआयच्या मेडिकल टीमने त्याला चेकअप करण्यासाठी थांबवले. जडेजाच्या जागी युजवेंद्र चहल याला पर्यायी म्हणून फिल्डिंगसाठी उभे केले होते. त्यानंतर चहलची 'कन्सिशन सबस्टिट्यूट' (डोक्याच्या दुखापतीमुळे मैदानावर उतरलेला पर्यायी खेळाडू) म्हणून ओळख झाली.
पहिल्या सामन्यात जडेजाने अवघ्या 23 चेंडूत पाच चौकार आणि एका षटकारासह नाबाद 44 धावांची शानदार खेळी खेळली. जडेजाच्या या खेळीमुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 162 धावांचे लक्ष्य दिले. लक्ष्य मिळविण्याचा प्रयत्न करताना ऑस्ट्रेलियाची टीम निर्धारित ओव्हर्समध्ये सात गडी गमावून केवळ 150 धावा करू शकली. यासह भारताने पहिला टी -20 चा सामना 11 धावांनी जिंकला. टीम इंडियाकडून युजवेंद्र चहलने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार ओव्हर्समध्ये 25 धावा देऊन तीन विकेट घेतले.